नवी दिल्ली : दहशतवादी, गुन्हेगारी टोळय़ा आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करणारे ‘ऑपरेशन ध्वस्त’ राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी हाती घेतले. याअंतर्गत पंजाब व हरियाणा पोलिसांचाही कारवाईत सहभाग आहे. या कारवाईअंतर्गत महाराष्ट्रासह नऊ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल ३२४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. 

पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, चंडीगड आणि मध्य प्रदेश येथे दिवसभर झालेल्या या धडक कारवाईत शस्त्रास्त्रे व दारूगोळा, आक्षेपार्ह साहित्य आणि रोख ३९ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

एनआयएने १२९ ठिकाणी, पंजाब पोलिसांनी १७ जिल्ह्यांमधील १४३ ठिकाणी आणि हरियाणा पोलिसांनी १० जिल्ह्यांतील ५२ ठिकाणी छापे घातले. ही कारवाई एकाच वेळी, बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाली. ‘ऑपरेशन ध्वस्त’चा भाग म्हणून घातलेल्या या छाप्यांमध्ये अनेक संशयितांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला अर्श डल्ला आणि लॉरेन्स बिष्णोई, छेनू पहलवान, दीपक तितर, भूपी राणा, विकाश लगरपुरिया, आशीष चौधरी, गुरप्रीत सेखाँ, दिलप्रीत बाबा, हरसिमरत सिम्मा आणि अनुराधा यांच्यासारखे कुख्यात गुंड यांच्यातील दहशतवादाचे संबंध (नेक्सस) मोडणे हा या छाप्यांचा उद्देश होता, असे एनआयएने सांगितले.

अंमली पदार्थाचे तस्कर आणि पाकिस्तान व कॅनडा या देशांमध्ये आश्रय घेतलेले दहशतवादी यांच्यासोबत ज्या टोळय़ा काम करतात, त्यांच्याशी संबंधित शस्त्रपुरवठादार, वित्तपुरवठादार, रसद पुरवठादार आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर छाप्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले होते, असे हा प्रवक्ता म्हणाला. छापे घालणाऱ्या पथकांनी एक पिस्तूल, जिवंत आणि वापरलेली अशी संमिश्र काडतुसे, ६९ मोबाईल फोन, पाच डीव्हीआर, २० सिमकार्ड, एक हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, वायफाय राऊटर, एक डिजिटल हातघडय़ाळ, दोन मेमरी कार्ड, ७५ कागदपत्रे आणि सुमारे ४० लाख रुपये रोख रक्कम जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्ष्य करून हत्या करणे, खलिस्तानवादी संघटनांना वित्तपुरवठा आणि खंडणी अशा कारस्थानांच्या संबंधात तीन गुन्हे दाखल केल्यानंतर, गेल्यावर्षी ऑगस्टपासून एनआयएने सुरू केलेल्या धडक कारवाईतील ही सहावी कारवाई होती. यापूर्वी झालेल्या कारवायांमध्ये २३१ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये चार जीवघेण्या हत्यारांसह ३८ शस्त्रास्त्रे आणि काडतुसांचे १,१२९ राऊंड जप्त करण्यात आले होते. आतापर्यंत ‘ऑपरेशन ध्वस्त’ अंतर्गत ८७ बँकखाती गोठविण्यात आली असून १३ मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत.