भ्रष्टाचाराविरोधातील इतर प्रलंबित विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास विरोधकांनी नकार दिल्यामुळे शुक्रवारी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास विरोधकांनी नकार दिल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
कमलनाथ म्हणाले, अधिवेशनाचा कालावधी आणखी काही दिवसांनी वाढविण्यासाठी मी विरोधी पक्षनेत्यांबरोबर चर्चा केली. अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मात्र, विरोधकांनी कालावाधी वाढविण्यास विरोध केला. त्यामुळे अधिवेशन शुक्रवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात येईल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हंगामी अर्थसंकल्प मांडण्यासाठी पाच फेब्रुवारीपासून सरकारने संसदेचे अधिवेशन बोलावले होते. त्यावेळी अधिवेशाचा कालावधी २१ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आला होता.
अधिवेशनाचा कालावधी वाढवायला विरोधकांचा विरोध – कमलनाथ
अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास विरोधकांनी नकार दिल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
First published on: 21-02-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppn parties did not agree to extend par session kamal nath