भ्रष्टाचाराविरोधातील इतर प्रलंबित विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास विरोधकांनी नकार दिल्यामुळे शुक्रवारी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास विरोधकांनी नकार दिल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
कमलनाथ म्हणाले, अधिवेशनाचा कालावधी आणखी काही दिवसांनी वाढविण्यासाठी मी विरोधी पक्षनेत्यांबरोबर चर्चा केली. अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मात्र, विरोधकांनी कालावाधी वाढविण्यास विरोध केला. त्यामुळे अधिवेशन शुक्रवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात येईल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हंगामी अर्थसंकल्प मांडण्यासाठी पाच फेब्रुवारीपासून सरकारने संसदेचे अधिवेशन बोलावले होते. त्यावेळी अधिवेशाचा कालावधी २१ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा