राज्यसभेचे कामकाज दीड तासांत तहकूब

नवी दिल्ली : विरोधकांच्या प्रचंड गोंधळात सोमवारी सकाळी दीड तासात राज्यसभेचे कामकाज १३ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. अखेरच्या दिवशी लोकसभेचे कामकाज मात्र नियमित सुरू राहिले. ‘सभापती जगदीप धनखड यांनी सातत्याने सूचना केल्यानंतर देखील विरोधकांनी सभागहाचे कामकाज चालू दिले नाही. या कृत्याबद्दल विरोधकांनी माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी राज्यसभेचे गटनेते पीयूष गोयल यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना केली.

Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Modi speech RajyaSabha Congress B R Ambedkar
PM Modi speech: काँग्रेसनं आंबेडकरांचा तिरस्कार केला आणि आज ते जय भीम…”, पंतप्रधान मोदींची टीका
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
pm narendra modi at maha kumbh
पंतप्रधानांचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान; महाराष्ट्र ते दिल्ली! मतदानाच्या दिवशीच मोदी काय काय करतात?
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे निलंबन आणि अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशीही केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, ‘जेपीसी’चे काय झाले, असा सवाल काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला. विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेल्या नोटिसा धनखड यांनी पुन्हा फेटाळल्या.

‘माझ्या भाषणातील भाग कामकाजातून वगळण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे. रजनी पाटील यांच्या निलंबनाआधी त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती’, असे म्हणत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींवर टिप्पणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या धनखड यांनी खरगेंच्या बोलण्यावर आक्षेप घेत त्यांचे विधान कामकाजातून काढून टाकले. ‘मी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे तुम्ही वेगवेगळय़ा शब्दांमध्ये सांगितले आहे. तुमचे शब्द कामकाजातून काढून टाकले जात आहेत. सभापती दबावाखाली काम करत असल्याचे तुम्ही जितक्या वेळा सांगाल, तितका तुम्ही सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याचा अधिकार गमावता’, असे धनखड म्हणाले. खरगे बोलायला उभे राहताच, सत्ताधारी बाकांवरून ‘मोदी-मोदी’चा जयघोष केला गेला.

अर्थसंकल्पीय भाषणावरील चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत शुक्रवारी उत्तर दिले होते. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा अखेरचा दिवस असल्याने राज्यसभेत सीतारामन यांनी चर्चेला उत्तर देणे अपेक्षित होते. पण, विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे धनखड यांनी शून्य प्रहरात सभागृह वीस मिनिटे तहकूब केले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस, आम आदमी पक्षाचे सदस्य सभापतींच्या समोरील मोकळय़ा जागेत येऊन घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे धनखड यांनी सभागृहाचे कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत, १३ मार्चपर्यंत तहकूब केले.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या उत्तरादरम्यान विरोधी पक्षांनी गोंधळ घातला होता. संसद टीव्हीवर फक्त मोदी व सत्ताधारी सदस्यांना दाखवले गेल्याने काँग्रेसच्या वतीने रजनी पाटील यांनी सभागृहातील कामकाजाचे मोबाइलवरून चित्रीकरण केले. या कृत्याबद्दल रजनी पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन मागे घेण्याची जोरदार मागणी विरोधकांनी सोमवारी केली. मात्र, या प्रकरणी विरोधी पक्षांनी माफी मागितली पाहिजे, त्यानंतर निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाईल, असे सभागृह नेते पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

Story img Loader