विरोधी पक्षाचे नेते केवळ पुतळे उभारण्याबाबत चर्चा करत आहेत त्यांना इतर विविध प्रश्नांवरील आपली दूरदृष्टी व्यक्त करण्यासाठी वेळ नाही. अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.
सिब्बल म्हणाले, “तुम्ही हे केले, तुम्ही ते केले, तुम्ही देशाचे नुकसान केले, असे वादप्रतिवाद आम्ही सध्या ऐकत आहोत. त्याऐवजी महत्वाच्या मुद्द्यांवर बोला सध्याची राजकीय भाषणे ही टीका आणि विरोध यांच्याभोवतीच फिरत आहेत. आपले देशासाठीचे व्हिजन काय? यावर एक चुकार शब्दही काढला जात नाही. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्थेबद्दलची तुमची दूरदृष्टी काय आहे? तुमचे पर्यायी व्हिजन काय आहे. याबाबत कोणीच बोलत नाही. नुसते पुतळे उभारण्याच्या चर्चा केल्या जात आहेत.तो पुतळा एक राष्ट्रभावना आहे. ती मनात ठेवा.”
एकतेची भावना हृदयातून येते की पुतळे उभारून असा सवालही सिब्बल यांनी यावेळी उपस्थित केला. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा नरेंद्र मोदी उभारत आहेत. त्याचा संदर्भ देत सिब्बल बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा