पीटीआय, बदायूं (उत्तर प्रदेश)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात दोन अल्पवयीन भावांची घरात घुसून हत्या करणारा आरोपी नाभिक यांच्याशी ओळख होती. पत्नीच्या प्रसूतीसाठी पैसे मागण्यासाठी तो तेथे गेला होता.

दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या वडील आणि काकाला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी  सांगितले की, आरोपी साजिद (२२) हा हत्या केल्यानंतर काही तासांनी झालेल्या चकमकीत मारला गेला तर त्याचा भाऊ जावेद फरार आहे. या परिसरात नुकतेच केशकर्तनालय उघडणाऱ्या साजिदने मंगळवारी घरात घुसून आयुष (१२), अहान उर्फ हनी (८) आणि युवराज (१०) या तीन अल्पवयीन भावांवर चाकूने हल्ला केला. यात आयुष आणि अहान यांचा मृत्यू झाला, तर युवराजला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत मुलांचे वडील खासगी कंत्राटदार असून, घटनेच्या वेळी ते जिल्ह्याबाहेर होते. घरी त्यांची पत्नी संगीता व्यतिरिक्त त्याची आई देखील होती. पोलिसांनी अद्याप या घटनेमागचा हेतू स्पष्ट केलेला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा >>>पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण

दुहेरी हत्याकांडावरून राज्यातील भाजप सरकारवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला. ‘धार्मिक संघर्ष हे भाजपसाठी उरलेलं शेवटचं शस्त्र आहे असा आरोप समाजवादी पक्षाने केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, ‘पोलिसांनी योग्य प्रकारे काम केले असते तर दोघांचेही जीव वाचू शकले असते. भाजप सरकार त्यांच्या उणीवा लपवू शकत नाहीत, ही चकमक त्यांचे अपयश लपवणार नाही,’ असे यादव म्हणाले.