नोटाबंदीवरुन मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. बुधवारी संसदेच्या आवारात विरोधी पक्षाचे खासदार धरणे आंदोलन केले. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घालून सरकारला धारेवर धरले. भाजपच काळा पैशावाल्यांच्या बाजूने आहे असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.

नोटाबंदीवरुन संसदेचे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापले आहे. काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत एकजूट दाखवत कामकाज रोखून ठेवले आहे.  मंगळवारी काँग्रेस, तृणमूल, डावे पक्ष, संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या दहा पक्षांची एकत्रित बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीत संसदेतील गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला  होता. यानुसार बुधवारी सकाळी संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ खासदारांनी आंदोलन केले.  राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील अन्य नेते आंदोलनासाठी जमले होते.

आंदोलनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वसामान्यांना वेठीस धरु नका, नोटाबंदीचा निर्णय मागे, मोदींनी संसदेतील चर्चेत उपस्थित राहावे अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन खासदार मोर्चात सहभागी झाले होते. सुमारे २०० खासदारांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता संसदेतील कामकाज सुरु होईपर्यंत खासदारांनी आंदोलन केले. यानंतर सर्व जण संसदेतील कामकाजासाठी निघून गेले. विशेष म्हणजे संसदेतील चर्चेत मोदींनी सहभागी व्हावे अशी मागणी विरोधक करत होते. विरोधकांचे आंदोलन सुरु असतानाच मोदी संसदेत दाखल झाले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरु होताच मोदी लोकसभेत उपस्थित होते. त्यामुळे मोदी संसदेत आल्याची माहिती विरोधकांना नव्हती का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

नोटाबंदीचा निर्णय हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर मोदींनी जर चांगले काम केले आहे तर ते संसदेत चर्चेपासून का पळत आहेत असा प्रश्न मायावती यांनी उपस्थित केला. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आहे, आता त्यांनीच संसदेत येऊन यावर उत्तर द्यावे अशी मागणी कम्यूनिस्ट पक्षाच्या खासदारांनी केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला.  गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

Live Updates
15:35 (IST) 23 Nov 2016
15:23 (IST) 23 Nov 2016
सत्तेत राहिल्याने काही लोकांचे डोळे आणि कान बंद झाले आहेत, या लोकांना सत्तेचा गर्व आहे - ममता बॅनर्जी
15:22 (IST) 23 Nov 2016
सरकारने विश्वासार्हता गमावली आहे - ममता बॅनर्जी
14:15 (IST) 23 Nov 2016
राज्यसभेचे कामकाज सुरु करावे, चर्चा करावी, पंतप्रधान सभागृहात येणारच नाही असे म्हणणे चुकीचे आहे - राज्यसभा सभापती
14:09 (IST) 23 Nov 2016
आम्ही वेतन किंवा भत्त्यासाठ नाही तर कामासाठी संसदेत आलो - प्रकाश जावडेकर यांनी अग्रवाल यांना सुनावले
14:09 (IST) 23 Nov 2016
खासदारांचे वेतन वाढवा - नरेश अग्रवाल यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
14:08 (IST) 23 Nov 2016
नरेश अग्रवाल यांनी सभागृहातील सदस्यांचा आदर करावा - राज्यसभा सभापती
14:05 (IST) 23 Nov 2016
नरेश अग्रवाल यांनी सत्ताधारी खासदारांवर आक्षेपार्ह टीका केल्याचा दावा.
14:04 (IST) 23 Nov 2016
विरोधकांनी राज्यसभेत भाड्यांवर माणसं आणल्याचा गंभीर आरोप केला - मुख्तार अब्बास नकवी यांचा राज्यसभेत दावा
14:02 (IST) 23 Nov 2016
राज्यसभेचे कामकाज सुरु, नोटाबंदीवरुन विरोधकांचा गदारोळ
13:26 (IST) 23 Nov 2016
13:25 (IST) 23 Nov 2016
आता गोरगरीब जनता रस्त्यावर उतरुन सरकारला उत्तर देणार - शरद यादव
13:24 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीमुळे गोरगरीबाचे घर उध्वस्त केले - शरद यादव
13:23 (IST) 23 Nov 2016
तुम्ही गाण्याच्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्याद्वारे बोलता, पण संसदेत येऊन नोटाबंदीच्या चर्चेत सहभागी होत नाही - शरद यादव यांची टीका, ममता बॅनर्जींच्या आंदोलनात यादव उपस्थित.
12:49 (IST) 23 Nov 2016
12:49 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीविरोधात जंतरमंतर येथे तृणमूल काँग्रेसचे आंदोलन, ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली आंदोलन
12:36 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीवरुन विरोधकांचा गोंधळ, लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
12:14 (IST) 23 Nov 2016
गरीबांना नोटाबंदीचा निर्णय यशस्वी व्हावा असे वाटते, मोदी त्यांना देवदूत वाटतात - व्यंकय्या नायडू
12:08 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीवरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, राज्यसभेचे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब
12:03 (IST) 23 Nov 2016
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण भाजपच काळा पैशावाल्यांसोबत आहे - काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे
11:28 (IST) 23 Nov 2016
राज्यसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब
11:10 (IST) 23 Nov 2016
लोकशाहीच्या मंदिरापासून मोदी का पळत आहेत ? - विरोधी पक्षातील खासदारांचा सवाल
11:07 (IST) 23 Nov 2016
संसदेबाहेर विरोधकांचे आंदोलन, लोकसभेचे कामकाजही दुपारी १२ पर्यंत तहकूब
11:05 (IST) 23 Nov 2016
संसदेतील मोर्चाचे नेतृत्व देशातील गरीब जनता करत आहे - राहुल गांधी
11:05 (IST) 23 Nov 2016
रांगेत सूटबूटमधील उद्योगपती किंवा भाजपचे नेते दिसत आहे का ? - राहुल गांधी
11:04 (IST) 23 Nov 2016
विरोधकांनाही भ्रष्टाचाराविरोधात लढा द्यायचा आहे, पण कोट्यावधी लोकांना यामुळे त्रास का द्यायचा - राहुल गांधी
11:04 (IST) 23 Nov 2016
आज देशातील विरोधकांमध्ये एकजूट आहे, सरकारने हा निर्णय का घेतला हे सांगितले पाहिजे - राहुल गांधी
11:03 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीचा निर्णय हा एक मोठा घोटाळा आहे, काही लोकांना याची आधीच माहिती होती - राहुल गांधी
11:03 (IST) 23 Nov 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील चर्चेत सहभाग घ्यावा, विरोधकांचे म्हणणे ऐकावे - राहुल गांधी
10:38 (IST) 23 Nov 2016
नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आहे, आता त्यांनीच संसदेत येऊन यावर उत्तर द्यावे - डी राजा, कम्यूनिस्ट पक्षाचे नेते
Story img Loader