नोटाबंदीवरुन मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. बुधवारी संसदेच्या आवारात विरोधी पक्षाचे खासदार धरणे आंदोलन केले. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घालून सरकारला धारेवर धरले. भाजपच काळा पैशावाल्यांच्या बाजूने आहे असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.
नोटाबंदीवरुन संसदेचे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापले आहे. काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत एकजूट दाखवत कामकाज रोखून ठेवले आहे. मंगळवारी काँग्रेस, तृणमूल, डावे पक्ष, संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या दहा पक्षांची एकत्रित बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीत संसदेतील गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार बुधवारी सकाळी संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ खासदारांनी आंदोलन केले. राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील अन्य नेते आंदोलनासाठी जमले होते.
आंदोलनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वसामान्यांना वेठीस धरु नका, नोटाबंदीचा निर्णय मागे, मोदींनी संसदेतील चर्चेत उपस्थित राहावे अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन खासदार मोर्चात सहभागी झाले होते. सुमारे २०० खासदारांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता संसदेतील कामकाज सुरु होईपर्यंत खासदारांनी आंदोलन केले. यानंतर सर्व जण संसदेतील कामकाजासाठी निघून गेले. विशेष म्हणजे संसदेतील चर्चेत मोदींनी सहभागी व्हावे अशी मागणी विरोधक करत होते. विरोधकांचे आंदोलन सुरु असतानाच मोदी संसदेत दाखल झाले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरु होताच मोदी लोकसभेत उपस्थित होते. त्यामुळे मोदी संसदेत आल्याची माहिती विरोधकांना नव्हती का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
नोटाबंदीचा निर्णय हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर मोदींनी जर चांगले काम केले आहे तर ते संसदेत चर्चेपासून का पळत आहेत असा प्रश्न मायावती यांनी उपस्थित केला. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आहे, आता त्यांनीच संसदेत येऊन यावर उत्तर द्यावे अशी मागणी कम्यूनिस्ट पक्षाच्या खासदारांनी केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
Live Updates
नोटाबंदीविरोधात संसदेच्या आवारात मानवी साखळी तयार करुन विरोधी पक्षाच्या खासदारांचे आंदोलन
आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित.
संसदेच्या आवारात विरोधी पक्षातील खासदारांच्या आंदोलनाला सुरुवात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा