पीटीआय, लखनौ

आयआयटी-बनारस हिंदू विश्वविद्यालयातील (बीएचयू) सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातपैकी दोन आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांनी रविवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महिला सुरक्षेच्या बाबतीत भाजपच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश झाल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. आनंद ऊर्फ अभिषेक चौहान आणि कुणाल पांडे या दोन आरोपींची गेल्या आठवड्यात वाराणसी तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. दोघांची सुटका झाल्यानंतर केक कापल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले.

Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Nurse molestation of minor girl Incidents at two government hospitals in West Bengal
परिचारिका, अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पश्चिम बंगालमधील दोन सरकारी रुग्णालयांतील घटना; आरोपी अटकेत
raymond cmd gautam singhania
Raymond in Bangladesh: “चीप माल हवा असेल तर चीनला जा, भारतात…”, रेमंडच्या संचालकांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”

उत्तर प्रदेश सरकारच्या कमकुवत अभ्यासामुळे आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर एक चित्रफीत प्रसारित करत केला आहे. लोक भाजपच्या राजकारणाला आता कंटाळले आहेत. आज भाजपची गाडी शेवटच्या स्थानकावर असून, प्रवास संपवण्यापूर्वी या पक्षाने हात जोडून देशाची माफी मागितली तर बरे होईल, असे यादव म्हणाले.

हेही वाचा >>>Odisha Liquor Ban : “ओडिशात दारूबंदी करा किंवा मद्यपींसाठी विमा योजना आणा”, बीजेडी आमदाराची मागणी

सर्वांना माहीत आहे की, महिलेवर सामूहिक बलात्कार करणारे हे भाजप आयटी सेलचे सदस्य त्यांच्या पक्षात खूप महत्त्वाचे आहेत. मोदी, योगी, जे. पी. नड्डा आणि इतर नेत्यांसोबत त्यांची छायाचित्रेही आहेत. सामूहिक बलात्कारानंतर भाजपच्या आयटी सेलच्या या सदस्यांना प्रचारासाठी मध्य प्रदेशात पाठवण्यात आले होते, असे काँग्रेसने ‘एक्स’वर म्हटले आहे. काँग्रेसने मोदी आणि योगी यांच्याबरोबर आरोपींची कथित छायाचित्रेही प्रसारित केली आहेत.

दरम्यान, पांडेचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि तो गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपासून तुरुंगात शिक्षा भोगत होता, असे त्याच्या वकिलाने न्यायालयात सुनावणीवेळी सांगितले होते. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण पहल यांनी चौहान याला २ जुलैला आणि पांडे याला ४ जुलैला जामीन मंजूर केला.