देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. तर आसाम, बंगळुरू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बंगळुरुमध्ये मुसधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा- Bed Bath & Beyond च्या सीएफओची १८ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
अनेक वाहनं पाण्याखाली
आसाममध्ये आधीच पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे कर्नाटकमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे बंगरुळूत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहनं पाण्याखाली गेली आहेत. रहिवासी भागात पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांची घरे जलमय झाली आहेत. तसेच काही ठिकाणी स्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा- Video : अवघ्या तीन सेकंदात ५० फूट उंचीवरून कोसळला आकाशपाळणा अन्….; धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद
जनजीवन विस्कळीत
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे बंगळूरु शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंगरुळू सरकारकडून बचावकार्य हाती घेण्यात आलं असून, पुरात अडलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.