दिल्लीत अवयवदानाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवयवदानाच्या रॅकेटमध्ये एका डॉक्टरसह एकूण ७ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक बांगलादेशचे आहेत. या प्रकरणात आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवयवदानाच्या रॅकेटमधील लोक एका प्रत्यारोपणासाठी तब्बल २५-३० लाख रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अवयवदानाच्या रॅकेटच्या माध्यमातून प्रत्यारोपण करण्यात आलेल्या लोकांमध्ये दोघेही बांगलादेशचे होते. हे रॅकेट २०१९ पासून सुरु असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा : चौघांनी हात-पाय धरून उलटं पकडलं, दोघांनी मारहाण केली; पश्चिम बंगालमधील आणखी एक Video व्हायरल, TMC पदाधिकारी पुन्हा चर्चेत!

दिल्लीचे पोलीस आयुक्त अमित गोयल यांनी या रॅकेटसंदर्भात बोलताना सांगितलं की, “या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार बांगलादेशी आहे. यामध्ये देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही बांगलादेशचे होते. या रॅकेटमधील सर्व लोकांचा बांगलादेशशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सहभागी असलेल्या एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या सात जणांची चौकशी सुरु आहे”, असं अमित गोयल यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीचे पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, “डॉक्टर महिलेला अटक करण्यात आली आहे. त्या महिलेचे दोन ते तीन रुग्णालयाबरोबर संपर्क असून यामध्ये त्या डॉक्टर महिलेची काय भूमिका आहे? याबाबतही तपास करण्यात येणार आहे. या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, भारताच्या मानवी अवयवांचे प्रत्यारोपण कायदा (२०१४) नुसार, अवयव दानाला फक्त आई-वडील आणि भावंड यांसारख्या रक्ताच्या नात्यामध्येच परवानगी आहे. मात्र, या प्रकरणामध्ये व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून या महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याचे अवयव काढले जात अशे, अशी प्राथमिक माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organ transplant racket busted in delhi 7 people including a doctor arrested gkt
Show comments