अमेरिकेच्या ज्या नेव्ही सील्सनी (नौसनिकांनी) अल काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात त्याच्या अबोटाबाद येथील निवासस्थानी कंठस्नान घातले होते त्यांच्यातच आता लादेनला नेमके कुणी मारले यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. मे २०११ मध्ये लादेनचा अमेरिकी नेव्ही सील्सनी खात्मा केला होता. लादेनला पहिली गोळी कुणी घातली हा आता वादाचा विषय बनला आहे. अमेरिकी सरकारने या गोष्टी उघड करू नका, असे त्यांना सांगितले असतानाही त्यांनी सर्व काही सांगून टाकण्याचे ठरवलेले दिसते.
वॉिशग्टन पोस्टने गुरूवारी माजी नौसनिक रॉब ओनिल याने असा दावा केल्याचे म्हटले आहे की, त्यानेच लादेनच्या कपाळावर गोळी मारली, अबोटाबादमध्ये लादेनच्या घरात घुसल्यावर शिताफीने आपण लादेनच्या खोलीत शिरलो व तो लादेन आहे हे समजताच त्याला गोळी मारली. ओनिल हा आता देशभरात फिरून प्रेरणात्मक भाषण करीत आहे, असे सील टीमच्या सदस्यांनी सांगितले.
नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले की, नेव्ही सीलच्या सदस्यांच्या मतानुसार ओनिल आधी लादेनच्या खोलीत गेलाच नाही, त्याच्या आधी दोन जण तिथे गेले व त्यांनीच लादेनला गोळ्या घातल्या. वॉिशग्टन पोस्टने म्हटले आहे की, ओनिलने दिलेल्या कबुलीनुसार लादेनला गोळी मारणाऱ्यात इतर दोन जण होते. त्यात माजी नौसनिक मॅट बिसोनेट याचा समावेश होता व त्याने २०१२मध्ये लादेनवरील छाप्यावर ‘नो इजी जे’ हे पुस्तकही लिहिले आहे, त्यातही लादेनला गोळी नेमकी कुणी मारली हे सांगितलेले नाही. एनबीसीने बिसोनेटच्या हवाल्याने गुरूवारी सांगितले की, दोन वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कहाण्या सांगत आहेत. ओनिल जे सांगतोय त्या विषयी आपण काही बोलणार नाही. गेल्यावर्षी ‘एस्क्वायर’ नियतकालिकाने सील सदस्यांपकी एकाची मुलाखत घेतली होती व तो ओनिलच होता असे आता सांगण्यात येते. ओनिलने लादेनला मारल्याचा दावा केला असला तरी इतर माध्यमांनी त्याबाबत शंका उपस्थित केली आहे.
ओनिलच्या संकेतस्थळावरील पानावर मात्र त्याचा उल्लेख सील असा करण्यात आला असला तरी त्याने लादेनला मारल्याचा उल्लेख नाही. बिसोनेट यांचे वकील रॉबर्ट ल्युसकिन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हेरगिरी धोरणाचा भंग करताना परवानगीविना पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल बिसोनेट याची नौदल गुन्हे चौकशी विभाग व न्याय विभागाकडून चौकशी झाली होती.
*२ मे २०११ रोजी अबोटाबाद येथील लादेनच्या हवेलीवर पहाटे एक वाजता अमेरिकन नौसैनिकांची धडक कारवाई.
*कारवाईत ओसामा बिन लादेन ठार. त्याच्याबरोबर त्याचे चार आप्तही ठार.
*‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ हे या कारवाईचे सांकेतिक नाव.
*लादेनचा मृतदेह अफगाणिस्तानला तात्काळ नेण्यात आला. ओळख पटवल्यानंतर अरबी समुद्रात त्याचे गोपनीय जागी २४ तासांत दफन.
*अल कायदाचा ६ मे रोजी लादेनच्या मृत्यूला दुजोरा व बदल्याचा इशारा.
लादेन कारवाईच्या ‘श्रेया’वरून वादंग
अमेरिकेच्या ज्या नेव्ही सील्सनी (नौसनिकांनी) अल काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात त्याच्या अबोटाबाद येथील निवासस्थानी कंठस्नान घातले होते त्यांच्यातच आता लादेनला नेमके कुणी मारले यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
First published on: 08-11-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osama bin laden killing us navy seals row over shooting