अमेरिकेच्या नेव्ही सील्सने केलेल्या कारवाईत मृत्युमुखी पडलेला अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन २००२ पासून पाकिस्तानात वास्तव्यास होता. गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळेच पाकिस्तानातील त्याच्या वास्तव्याबद्दल आणि अमेरिकेने त्याला शोधून त्याच्याविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल पाकिस्तान सरकार अनभिज्ञ होते, अशी माहिती नुकतीच उजेडात आलीये.
लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने केलेल्या कारवाईबद्दल पाकिस्तानमधील सरकारने तयार केलेला गोपनीय अहवाल नुकताच फुटला. याच अहवालामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील राजकीय अस्थैर्यामुळे गुप्तचर यंत्रणा अमेरिकेची कारवाई आणि लादेनचे पाकिस्तानातील वास्तव्य याबद्दल माहिती जमविण्यात अपयशी ठरल्या, असाही ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
लादेनला टिपण्यासाठी अबोटाबादमध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईची माहिती पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना सर्वांत शेवटी देण्यात आली होती. पाकिस्तानचे लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांनी कारवाई झाल्यानंतर पाच तासांनी त्याबद्दलची माहिती झरदारी यांना दिली होती, असेही या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानने आपल्या पश्चिमेकडील सीमेवरील सुरेक्षेकडे कायमच दुर्लक्ष केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
ओसामा बिन लादेन २००२ पासूनच पाकिस्तानात वास्तव्यास होता
अमेरिकेच्या नेव्ही सील्सने केलेल्या कारवाईत मृत्युमुखी पडलेला अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन २००२ पासून पाकिस्तानात वास्तव्यास होता.

First published on: 09-07-2013 at 11:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osama in pak since 2002 zardari last to know of raid reveals leaked report