नवी दिल्ली : भारतीय मोटर वाहन उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या आणि मध्यमर्गीयांच्या चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ओसामु सुझुकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना लिम्फोमा नावाच्या आजाराने ग्रासले होते. बुधवार, २५ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आली.

ओसामू सुझुकी हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते. १९८१ मध्ये मारुती उद्याोग लिमिटेडबरोबर संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारबरोबर भागीदारी करण्याचा धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व, अशी सुझुकी यांची ओळख आहे. तत्कालीन काळात परवाना व्यवस्थेअंतर्गत भारत ही एक बंद अर्थव्यवस्था होती. तेव्हा सुझुकी यांना देशातील मोटर वाहन उद्याोगाला चालना तथा नवीन दिशा देणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. २००७ मध्ये सरकारने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मारुती उद्याोग लिमिटेडनंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणून नावारूपाला आली.

right to information activist krishna demands security
माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा यांची केंद्राकडे सुरक्षेची मागणी; ‘मुदा’ घोटाळा प्रकरण; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”

हेही वाचा >>> माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा यांची केंद्राकडे सुरक्षेची मागणी; ‘मुदा’ घोटाळा प्रकरण; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र

सुझुकी यांची दुरदृष्टी, जोखीम घेण्याची इच्छा, भारताबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि एक शिक्षक म्हणून त्यांच्या अफाट क्षमतांशिवाय भारतीय मोटर वाहन उद्याोगाने भरारी घेणे अशक्य होते, अशा भावना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केल्या. विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते, असेही ते म्हणाले.

सुझुकी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानमधील गेरो येथे झाला. चुओ विद्यापीठातून विधि शाखेची पदवी प्राप्त केली होती. एप्रिल १९५८ मध्ये त्यांनी तत्कालीन सुझुकी मोटर कंपनी लिमिटेडमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर १९६३ मध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि डिसेंबर १९६७ मध्ये ते संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.

Story img Loader