डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला केंद्रातील काँग्रेस सरकारने मुद्दाम विलंब लावला, अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. गतवर्षी पाच डिसेंबरला इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली होती. वर्षभरानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. येत्या ५ डिसेंबरला प्रस्तावित स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन न झाल्यास ६ डिसेंबरला आरपीय आपल्या पद्धतीने भूमिपूजन करील, असा इशारा आठवले यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला.
इंदू मिलची जागा मिळाल्याचे श्रेय स्वत:कडे घेत आठवले म्हणाले की, आरपीआयने गतवर्षी आंदोलन केले म्हणून इंदू मिलची जागा मिळाली. याचे श्रेय आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही पक्ष-संघटनेस देण्यास आठवले यांनी नकार दिला. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रस्ताव काँग्रेस सरकारने मुद्दाम रोखला. वर्षभराचा कालावधी कोणतीही प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा असतो. पण काँग्रेसने आंबेडकरी जनतेच्या भावनेची कदर केली नाही. २५ नोव्हेंबरला कॅबिनेटने डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक विधेयकात सुधारणा करण्यास अनुकूलता दर्शवल्यानंतर जलद कार्यवाही होण्याची गरज आहे. ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हे विधेयक सरकारने मंजूर करवून घ्यावे. संसदेतील प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत किमान इंदू मिलवर भूमिपूजन व्हायलाच हवे, अशी आग्रही मागणी आठवले यांनी केली. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत चार ठिकाणी आरपीआयचे उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी भाजपला समर्थन दिल्याचे आठवले म्हणाले.
अन्यथा इंदू मिलमध्ये ६ डिसेंबरला भूमिपूजन करू -आठवले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला केंद्रातील काँग्रेस सरकारने मुद्दाम विलंब लावला, अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
आणखी वाचा
First published on: 30-11-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Otherwise indu mill land worship on december 6 athavale