उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत एमआयएम १०० जागा लढवणार असल्याची घोषणा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख व खासदार यांनी केली आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून उत्तर प्रदेश निवडणूक एमआयएम लढवणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. शिवाय ओवेसींनी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती. अखेर आता ओवेसींनी स्वतः याबाबत घोषणा केली. याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की ते आघाडीसाठी देखील प्रयत्न करत आहेत.
ओवेसींनी सांगितले की, आमच्या पक्षाने या निवडणुकीत १०० जागा लढवण्याचे ठरवले आहे. आम्ही एक-दोन पक्षांशी आघाडीबाबत चर्चा देखील करत आहोत. आघाडी होईल की नाही हे आगामी काळात समजेलच. आम्ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहोत.