कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) काढताना त्यावर कर लादण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मोदी सरकारने मागे घेतल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वडेरा पुढे सरसावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रॉबर्ट वडेरा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून मी प्रत्येकाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर माझे सहकारी आणि जिममधल्या मित्रांनी मिठाई देऊन माझे आभार मानल्याचे रॉबर्ट वडेरा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय, पोस्टवरील तुमचे लाईक्स आणि शेअर्स यामुळे प्रसारमाध्यमांनी हा संदेश सरकारपर्यंत पोहचवल्याचा दावा वडेरा यांनी केला आहे.
अखेर सरकारची करमाघार!
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत यासंदर्भातील घोषणा केली होती. यानंतर काँग्रेस पक्ष अपेक्षेप्रमाणे या सगळ्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावताना दिसला. वेतनदारांच्या गळचेपीविरुद्ध मी सरकारला इशारा दिला होता. अखेर माझ्या दबावाचा परिणाम झाला, असे काल राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
‘ईपीएफ’वरील कर माझ्यामुळे रद्द; रॉबर्ट वडेरांचा दावा
वेतनदारांच्या गळचेपीविरुद्ध मी सरकारला इशारा दिला होता. अखेर माझ्या दबावाचा परिणाम झाला
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2016 at 13:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of the blue robert vadra takes credit for epf tax rollback