पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशामध्ये गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होऊन नऊ वर्षे झाली. मात्र, या काळात देशातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ नाहीत असे मत बहुसंख्य भारतीयांनी व्यक्त केले आहे. समाजमाध्यमावरील ‘लोकल सर्कल’ या समुदाय व्यासपीठाने देशातील ३४१ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे.

आपल्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता वाढली आहे असे सुमारे ४२ टक्के लोकांनी सांगितले. पण त्यांची स्थिती चांगली नसल्याचे मत ५२ टक्के लोकांनी व्यक्त केले. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३७ टक्के लोकांच्या मते सार्वजनिक शौचालय साधारण किंवा कामापुरते ठीक आहे, २५ टक्के लोकांनी ते सरासरीपेक्षा वाईट, क्वचितच काम करत असल्याचे सांगितले, १६ टक्के लोकांना ते भयानक वाटले आणि १२ टक्के लोकांनी सांगितले की ते इतके वाईट होते की ते वापर न करताच बाहेर आले.

हेही वाचा>>>राहुल गांधींची पंजाबमध्ये अध्यात्मिक भेट, गोल्डन टेम्पलमध्ये घासली भांडी; पाहा VIDEO

सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याऐवजी एखाद्या व्यावसायिक आस्थापनामध्ये जाऊन तेथील शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देऊ असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य लोकांनी सांगितले. मुंबई, दिल्ली किंवा बंगळूरु यासारख्या शहरांमध्ये सुलभ शौचालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेने व्यवस्थापन केलेले नसेल तर सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे एखाद्य दु:स्वप्नासारखे असते असेही या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. ३४१ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये ३९ हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outrage over public toilets across the country amy
Show comments