चीनच्या नैर्ऋत्य भागातील युनान प्रांतात शांग्रिला या प्राचीन तिबेटी शहरात लाकडाची २४० घरे आगीत भस्मसात झाली.यावेळी २६०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
शांग्रिलातील डय़ुकेझाँग या भागात शनिवारी सकाळी ही आग लागली. चंद्राचे शहर म्हणून ओळखल्या जाणारे हे शहर १३०० वर्षांपूर्वी साउथ सिल्क रस्त्यावर वसवण्यात आले होते. घरे लाकडाची असल्याने आग विझवणे सोपे नव्हते असे ‘शिनहुआ’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.  आगीत प्राणहानी झालेली नाही. डय़ुकझाँग हे शांग्रिलातील एक प्रसिद्ध रिसॉर्ट असून प्राचीन तिबेटी घरे तिथे संवर्धन करून आहे तशीच राखली होती. याप्रकरणी जाळपोळीची शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली. घरांशिवाय काही दुकाने, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक अवशेष व मौल्यवान तिबेटी थंगका व इतर वस्तू आगीत जळाल्या.

Story img Loader