प्रसारभारती आणि आकाशवाणीत नोकरीचं देण्याचं आमीष दाखवून दिल्लीत ३०० हून जास्त जणांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीतल्या एका व्यक्तीने सुमारे ३०० जणांना हजारो रुपयांना गंडा घातला आहे. पंकज गुप्ता असं या भामट्याचं नाव आह

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साधारण २० व्या वर्षापासून आपल्याकडे तरूण-तरूणी नोकरी शोधण्यास सुरूवात करतात. अशाच काही जणांनी पंकज गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. पंकज गुप्ता हा स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचं भासवत होता. त्याने ८०० हून जास्त लोकांना नोकरी लावतो असं सांगितलं होतं.

पंकज गुप्ताने नेमकं काय केलं?

पंकज गुप्ता नोकरी लावण्याच्या नावाखाली प्रत्येक उमेदवाराकडून रजिस्ट्रेशन शुल्क या नावाखाली ३ हजार रूपये घेत होता. त्यानंतर तुमची निवड प्रसारभारतीसाठी किंवा आकाशवाणीसाठी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही मला १० हजार, २० हजार रूपये द्या असंही तो काही होतकरू तरूण तरूणींना सांगत होता. मात्र या सगळ्यांची फसवणूक झाली. कारण नोकरी कधी मिळणार यासाठी फोन करायला सुरूवात केल्यावर पंकज गुप्ता फरार झाला. ११ जानेवारीला फसवणूक झालेल्या चार तरूणांनी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला तेव्हा पंकज गुप्ताने केलेला हा घोटाळा उघड झाला. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हे सांगितलं की गेल्या वर्षी आम्ही पंकज गुप्ताशी संपर्क साधला होता. आम्ही जिथे राहतो तिथल्या सुमारे ८०० मुला-मुलींना पंकज गुप्ताने नोकरी लावतो असं आश्वासन दिलं होतं.

प्रत्येकाकडून घेतले पैसे


विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज गुप्ताने प्रसारभारतीत नोकरी लावतो असं सांगत नोंदणी अर्जाचे ३ हजार रूपये प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून घेतले. असे ८०० अर्ज त्याने भरले होते असंही आम्हाला समजलं आहे असं मुलांनी सांगितलं. तर ३०० हून जास्त मुलांना मी तुमचीच निवड प्रसारभारतीमध्ये करायला सांगतो हे सांगत १० हजार, १५ हजार, २० हजार अशी रक्कम जवळपास ३०० मुलांकडून उकळली.

पंकज गुप्ताने ३०८ तरूण-तरूणींना काय सांगितलं होतं?

पंकज गुप्ताने ३०८ मुलांकडून वेगवेगळ्या रकमा घेतल्या होत्या. त्या सगळ्यांना प्रसारभारती आणि आकाशवाणी कार्यालयात नोकरी लावतो असं सांगितलं तसंच त्या सगळ्यांना तुम्ही तुमची सगळी कागदपत्रं घेऊन या कार्यलयांमध्ये पडताळणीसाठी या असंही सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा हे सगळे जण कार्यालयात पोहचले तेव्हा कार्यालय बंद होतं. यानंतर आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे फोन नंबर बंद होते आणि घरून तो फरार झाला होता. यानंतर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला असंही या तरूणांनी त्यांच्या जबाबात सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 300 cheated in delhi with fake job offers at prasar bharti and akashvani scj