US Presidential Election Results 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीचे निकाल समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे २०० जागांवर आघाडी घेऊन होते, तर कमला हॅरिस यांनी ९१ जागांवर आघाडी घेतली होती. सुरुवातीच्या कलानुसार ट्रम्प बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसले. तत्पूर्वी मतदानानंतर एग्झिट पोलही जाहीर झाले होते. मंगळवारी मतदान केलेल्या एक तृतीयांश मतदारांना अमेरिकेतील लोकशाही धोक्यात असल्याची भीती वाटत आहे, अशी माहिती एडिसन रिसर्चच्या एग्झिट पोलमधून समोर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एडिसन रिसर्चने गोळा केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मतदारांसमोर लोकशाही आणि अर्थव्यवस्था हे सर्वात चिंतेचे विषय आहेत. तर गर्भपात आणि इमिग्रेशन हे त्यापाठोपाठ येणारे मुद्दे आहेत. एडिसनच्या एग्झिट पोलनुसार ७३ टक्के लोकांना लोकशाही धोक्यात असल्याचे वाटते. तर फक्त २५ टक्के लोकांना लोकशाही सुरक्षित असल्याचे वाटते, अशी बातमी रॉयटर्सने दिली आहे.

हे वाचा >> US Election Results 2024 Live Updates: कमला हॅरीस यांना अमेरिकन महिलांची ५४ टक्के मतं; वाचा कुणाला कुणाची किती मतं मिळाली!

लोकशाहीचे संवर्धन आणि बळकटीकरण करणे हा कमला हॅरिस यांचा प्रचारातील मुख्य मुद्दा होता. एग्झिट पोलनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाजूने ४४ टक्के जनमत आहे. २०२० साली ट्रम्प यांच्या बाजूने ४६ टक्के जनमत होते. यंदा त्याच्यात थोडीशी घसरण झाली आहे. मंगळवारी अमेरिकेतील कोट्यवधि मतदारांनी देशाच ४७ वा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी मतदान केले.

प्रचारादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी मध्यम वर्गाला दिलासा देण्यावर भर दिला. अमेरिकेतील १०० दशलक्ष लोकांना दिलासा देण्यासाठी कर सवलत देणे, परवडणारी घरे देणे, महिलांच्या गर्भपातावरील बंदी उठविण्यासारखी आश्वासने कमला हॅरिस यांनी दिली आहेत.

दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची घोषणा केली आहे. विदेशी वस्तूंवर अधिक कराची आकारणी, ऊर्जा निर्मितीमधील खर्च कमी करणे, अशा प्रकारची आश्वासने ट्रम्प यांनी दिली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 70 percent us voters say american democracy under threat america exit poll reveals kvg