नागालँड राज्यात गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या ३४ हजार ३४१ आह़े शालेय शिक्षण मंडळ, नागालँडच्या वतीने आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा गुरुवारी सकाळपासून सुरू झाली़ कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांची ही परीक्षा राज्यभरातील ४३ परीक्षा केंद्रांवर १ एप्रिलपर्यंत चालणार आह़े या परीक्षेला एकूण १३ हजार ३२ विद्यार्थी बसले होत़े़ या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा १ हजार ५७ ने वाढणार आह़े तर २१ मार्चपर्यंत राज्यातील ६९ परीक्षा केंद्रांवर चालणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा एकूण २१ हजार ३१० विद्यार्थी बसले आहेत़ यात १० हजार ६२४ मुली आहेत़
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in