गणपतीचा फोटो व्हॉट्स अॅप डीपी ठेवला म्हणून एका २९ वर्षीय महिलेला तिचा पूर्वाश्रमीचा नवरा आणि त्याच्या पत्नीने मारहाण केली. अहमदाबादच्या अस्तोदीया भागात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या महिलेचा पूर्वश्रमीचा पती आणि पत्नी विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

माझे पूर्वाश्रमीचे पती कल्पेन कृष्णकांत वेलेरा आणि त्यांची पत्नी धारा वेलेरा अस्तोदीया येथील माझ्या घरी आले व त्यांनी वाद घालायला सुरुवात केली असे आदिती मधू (२९) या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. माझ्या लग्नाच्यावेळी कल्पेनच्या घरात गणपतीचे चित्र काढण्यात आले होते. तो फोटो मी व्हॉट्स अपॅवर डीपी म्हणून का ठेवला? असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यांनी त्यावरुन मला भरपूर सुनावले व मारहाण सुरु केली. जेव्हा माझ्या भावाने मध्ये पडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कल्पेनने त्याला सुद्धा मारहाण केली असे आदिती मधूने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

मधूचे कल्पेन वलेरा बरोबर तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण आठ महिन्यांपूर्वी दोघे घटस्फोट घेऊन विभक्त झाले. त्यानंतर कल्पेनने धारा बरोबर दुसरे लग्न केले. लग्नाच्यावेळी काढलेले कुठलेही फोटो डिपी म्हणून ठेवलेस तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आपल्याला कल्पेनने दिली आहे असे आदिती मधूने तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader