मागील दीड वर्षात सुमारे १० लाख पद भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. या लोकांना सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये काम मिळणार आहे. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्ष काँग्रेससह एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

“मोदी सरकारने मागील आठ वर्षात १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, त्याऐवजी आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून ५-५ लाख नोकऱ्या देण्याचे ते बोलत आहेत. केंद्र सरकारकडे ५५ लाख मंजूर पदं होती, पण ते फक्त १० लाख नोकऱ्या देत आहेत.” असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी म्हटले आहे.

काँग्रेसची जोरदार टीका –

नोकऱ्यांसंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत भाष्ये केले आहे. “याला ९०० चूहे खाकर बिली हज को चली म्हटले जाते. आपण ५० वर्षातील सर्वात वाईट रोजगार (दर) अनुभवत आहोत. रुपयाचे मूल्य ७५ वर्षातील सर्वात कमी आहे. ‘ट्विटर ट्विटर’ खेळून पंतप्रधान किती काळ आमचे लक्ष विचलित करणार,” असे सुरजेवाला म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi criticizes modi governments decision to recruit 10 lakh posts in a year and a half msr
Show comments