उत्तर प्रदेशातील मदरशांचे सर्वेक्षण: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना मदरशांच्या शिक्षण व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. योगी सरकारच्या आदेशावर संतापलेल्या ओवेसी म्हणाले की, ही छोटी एनआरसी आहे.

ओवेसी म्हणाले की, असे अनेक मदरसे आहेत जे खासगी आहेत आणि त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही किंवा सरकार त्यांना निधी देत ​​नाही. मग सरकार सर्वेक्षण का करत आहे?, असा सवाल त्यांनी केला. तसेच, ओवेसी म्हणाले, “मी जर मदरसा सुरू केला तर इस्लामिक पद्धती शिकवण्यासाठी आणि त्यांना मौलाना बनवण्यासाठी मी तो सुरू करत असतो. राज्य सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

हा छोटा NRC –

उत्तर प्रदेश सरकारने मान्यता नसलेल्या मदरशांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, घटनेनुसार मला माझे मदरसे उघडण्याचा आणि शैक्षणिक संस्था उघडण्याचा अधिकार आहे, सरकार यात हस्तक्षेप का करेल. त्यांना हे सर्वेक्षण का करायचे आहे? असा सवाल ओवेसी यांनी सरकारला केला. ते त्यांना पगार देतात का? आणि त्यांचा काय संबंध आहे.

याशिवाय ओवेसी यांनी जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “एक आदेश जारी करा आणि थेट सांगा की मुस्लिमांनी राहू नका, कुराण वाचू नका. हा सर्वे नसून छोटा एनआरसी आहे.”

सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत सर्व मान्यता नसलेल्या मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांचे सर्वेक्षण अहवाल २५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे पाठवायचे आहेत. या प्रकरणाची माहिती देताना राज्यमंत्री (अल्पसंख्याक कल्याण) दानिश रझा यांनी सांगितले की, मदरशांमधील कर्मचारी आणि शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी यूपी सरकारच्या सर्वेक्षणाच्या या आदेशावरून आता राजकारण तापू लागले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी यूपी सरकारच्या मान्यता नसलेल्या मदरशांचे सर्वेक्षण करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे.

Story img Loader