जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग तंत्रज्ञानामुळे चोरटय़ांनी पळवलेली गाडी टाकून देण्याची वेळ आल्याची घटना येथे घडली. चोरटय़ांनी लिंक रोड येथे एक विवाह समारंभ चालू असताना चालकासह एक एसयूव्ही मोटार पळवली पण मोटार मालकाने जीपीएसच्या मदतीने गाडीचे इंजिन बंद केल्याने या चोरटय़ांना ही मोटार आहे तेथेच सोडून पळ काढावा लागला.
कवीनगर भागातील डायमंड उड्डाणपुलावर ही गाडी नंतर सोडून दिलेली सापडली. कवीनगरचे पोलीस अधिकारी अशोक शिसोदिया यांनी सांगितले की, चार चोरटय़ांनी चालक अनिल कौशिक याला धमकावले व त्याला गाडीतच दडपून ती पळवली. विवाह समारंभाच्या ठिकाणाहून ही गाडी पळवल्याचे लक्षात येताच गाडीचे मालक एस.एन. शर्मा यांना मोबाईलवर गाडीच्या अचानक झालेल्या हालचालींबाबत संदेश आला होता त्यामुळे त्यांनी जीपीएसच्या मदतीने गाडीचे इंजिन बंद केले.चोरांनी ही गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी ती चालू झाली नाही.

Story img Loader