Oxfam Report : ब्रिटिशांनी भारतावर राजवट केली त्या काळात ब्रिटिशांनी भारतातून किती संपत्ती लुटली? यासंदर्भातील माहिती आता एका अहवालातून समोर आली आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षांत भारतातून लुटलेल्या संपत्तीचा आकडा या अहवालातून सांगण्यात आला आहे. तसेच जेवढी संपत्ती भारतातून लुटली त्या संपत्तीचा फायदा फक्त काही टक्के श्रीमंत लोकांनीच घेतल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
ब्रिटिशांनी भारतात केलेल्या राजवटीच्या काळात किती संपत्ती लुटली? यासंदर्भातील ऑक्सफॅम इंटरनॅशनलने अहवाल महत्वाची माहिती दिली आहे. या अहवालात असं म्हटलं आहे की, १७६५ ते १९०० या काळात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल ६४.८२० लाख कोटी डॉलर्स रक्कम लुटली. मात्र, या लुटलेल्या संपत्तीतील सर्वाधिक ३३,८०० अब्ज डॉलर संपत्ती ही फक्त १० टक्के श्रीमंत लोकांकडे गेली, अशी माहिती ऑक्सफॅमच्या अहवालात देण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.
दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या काही तास आधी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या आधी प्रसिद्ध केला जातो. या अहवालात अनेक अभ्यास आणि शोधनिबंधांचा हवाला देत आधुनिक बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन ही केवळ वसाहतवादाची निर्मिती असल्याचं म्हटलं आहे.
ऑक्सफॅमने म्हटलं की, “ऐतिहासिक वसाहतीच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या असमानता आणि लुटमारीच्या विकृती या अद्यापही आधुनिक काळात एक नवीन आकार देत आहेत. या गोष्टीमुळे सध्याचं जग असमान निर्माण झालेलं आहे. त्यामुळे वंशवादावर आधारित विभाजन झालेलं आणि ग्रासलेले जग निर्माण होत आहे. विविध अभ्यास आणि संशोधन पेपर्सच्या आधारे ऑक्सफॅमने केलेल्या अभ्यासास असं आढळून आलं की,१७६५ ते १९०० या काळात ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांनी केवळ भारतातून ३३,८०० अब्ज डॉलर्सची संपत्ती लूटली.
तसेच १७६५ ते १९०० या वसाहतवादाच्या काळात ब्रिटनने भारतातून लुटलेल्या संपत्तीबाबत अहवालात असंही म्हटलं की सर्वात श्रीमंत लोकांव्यतिरिक्त वसाहतवादाच्या मुख्य लाभार्थ्यांमध्ये नव्याने उदयास आलेल्या मध्यमवर्गाचाही समावेश आहे. तसेच दीडशे वर्षांच्या काळात ब्रिटिशांनी भारतातून लुटलेल्या संपत्तीचे लाभार्थी अतिश्रीमंतांच्या पलीकडे वसाहतवादाचे मुख्य लाभार्थी नव्याने उदयास आलेले मध्यमवर्ग होते. सर्वात श्रीमंत १० टक्के ज्यांना या उत्पन्नाच्या ५२ टक्के मिळाले आणि नवीन मध्यमवर्गाला आणखी ३२ टक्के मिळाले.