गुरुग्राममधील एका उंच इमारतीवरून पडल्याने OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रितेश अग्रवाल यांनी एक निवेदन जारी करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली.
हेही वाचा – कोका कोलाला टक्कर द्यायला कँपा कोला सज्ज! जाणून घ्या लोकप्रिय ब्रांडच्या उदय आणि अस्ताची कहाणी
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, रमेश अग्रवाल हे गुरुग्राममधील DLF क्रिस्टा सोसायटीमध्ये २०व्या मजल्यावर राहत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमाराम आपल्या घराच्या बाल्कनीत उभे असताना २०व्या मजल्यावरून ते खाली पडले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – मित्रांच्या चॅलेंजनंतर १३ वर्षीय मुलीने खाल्ल्या लोहाच्या ४५ गोळ्या, तीन दिवसांनंतर…
दरम्यान, याप्रकरणी रितेश अग्रवाल यांनीही एक निवेदन जारी करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. मी जड अंत:करणाने सांगू इच्छितो की माझे वडील रमेश अग्रवाल यांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यांनी माझ्यासह अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही न भरून निघणारं आहे, असे ते म्हणाले. तसेच या दुख:च्या प्रसंगी सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.