आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी नव्हे, तर केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदबंरम हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत, असे ‘द इकॉनॉमिस्ट’ ने म्हटले आहे. काँग्रेस पक्षाची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची जी रणनीती आहे त्याचा पर्दाफाश या ख्यातनाम साप्ताहिकाने केला आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याची जी कॅश ट्रान्सफर योजना आहे त्यावर काँग्रेस पक्षाने भर दिला आहे. दुसरी बाब म्हणजे ही निवडणूक ही आर्थिक प्रश्नावर लढली जाणार आहे हे सूचित होत असून त्यामुळेच काँग्रेसने पी.चिदंबरम यांच्या रूपाने कार्यक्षम अर्थमंत्र्याला पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे असे सांगण्यात येत आहे. नुकतेच चिदंबरम हे मुंबईतही येऊन गेले व त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शिकवणी घेतली, त्यात त्यांनी काँग्रेसच्या योजना लोकांसमोर कशा मांडायच्या याचे धडे दिले.
काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीचा ‘द इकॉनॉमिस्ट’कडून पर्दाफाश!
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी नव्हे, तर केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदबंरम हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत, असे ‘द इकॉनॉमिस्ट’ ने म्हटले आहे. काँग्रेस पक्षाची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची जी रणनीती आहे त्याचा पर्दाफाश या ख्यातनाम साप्ताहिकाने केला आहे.
First published on: 03-12-2012 at 02:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram candidat for pm from congress