भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना भाजप नेते अरुण जेटली यांनी सोयीस्कर बगल दिल्याचा आरोप करीत केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदम्बरम यांनी जेटलींवर पलटवार केला आह़े  तसेच मोदी विविध आर्थिक विषयांबाबत का काहीच बोलत नाहीत, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आह़ेचिदम्बरम यांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार जेटली यांनी घेतला होता़  त्याला उत्तर देताना चिदम्बरम म्हणाले की, त्यांनी माझे काही प्रश्न सोयीस्करपणे टाळल़े  मोदी वित्तीय तूट, चालू खात्यातील तूट किंवा पतधोरण याबाबत गप्प का आहेत? मध्य प्रदेश आणि गुजरातने वस्तू आणि सेवा कराला का विरोध केला? अन्नसुरक्षा कायद्याविरोधात मोदींनी पंतप्रधानांना का लिहिले? किरकोळ बाजारात थेट परकीय गुंतवणूक झाल्यास नोकऱ्या कशा कमी होतील, असे काही प्रश्नही चिदम्बरम विचारले होते

Story img Loader