नवी दिल्ली : नव्या फौजदारी विधेयकांवर गृहविषयक संसदीय स्थायी समितीमध्ये सखोल अभ्यास केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार पी. चिदम्बरम यांची या अत्यंत महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती  करण्यात आली आहे. ऐन मोक्याच्या वेळी चिदम्बरम यांचा समितीत समावेश झाला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी सोमवारी आठही स्थायी समितीची पुनस्र्थापना केली.

हेही वाचा >>> साथरोगांच्या नियंत्रणासाठी जागतिक निधी; जी-२० च्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

फौजदारी तपासप्रक्रिया व शिक्षेसंदर्भातील तीन विधेयकांवर सध्या गृहविषयक स्थायी समितीमध्ये चर्चा केली जात आहे. भारतीय दंड विधानाऐवजी (आयपीसी) भारतीय न्याय संहिता (बीएनएस), भारतीय पुरावा कायद्याची (आयईए) जागा भारतीय शिक्षा संहिता तर, फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी (सीआरपीसी) नागरिक सुरक्षा संहिता असे तीन कायदे केले जाणार आहेत. या संदर्भातील तीनही विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेत मांडली होती व त्यावर सखोल चर्चा करण्यासाठी ती स्थायी समितीकडे पाठवली गेली होती.

गेल्या आठवडय़ात तीन दिवस केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी समितीच्या सदस्यांसमोर सादरीकरण केले होते. हा विधेयकांच्या मसुद्यावर स्थायी समितीला तीन महिन्यांमध्ये संसदेला अहवाल सादर करावा लागणार आहे. समितीतील पहिल्या टप्प्यातील चर्चेमध्ये चिदम्बरम यांना सहभागी होता आले नसले तरी, पुढील बैठकांमध्ये चिदम्बरम  यांच्या सूचना महत्त्वाच्या ठरू शकतील. 

हेही वाचा >>> VIDEO : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रूपयांची कपात, स्मृती इराणी म्हणाल्या, “पंतप्रधानांनी…”

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार पी. भट्टाचार्य निवृत्त झाल्यामुळे गृहविषयक स्थायी समितीतील जागा रिक्त झाली होती. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हेही या समितीचे सदस्य आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या सादरीकरणानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या विधेयकांवर राज्या-राज्यात जाऊन कनिष्ठ न्यायालयात सक्रिय असलेल्या वकिलांशी चर्चा करण्याची सूचना केली होती.

विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण व वनविषयक स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार व मुख्य प्रतोद जयराम रमेश यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. अन्य सहा समितींचे अध्यक्षपद भाजप व ‘एनडीए’तील घटक पक्षांकडे आहे.

आक्षेपातून दिशादिग्दर्शन

या समितीचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिज लाल यांच्याकडे असले तरी, चिदम्बरम आक्षेपाचे मुद्दे मांडून सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणू शकतील. चिदम्बरम हे कायदेतज्ज्ञच नाहीत तर, त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्रालयही सांभाळले होते.