द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यावर समाजवादी पक्षाच्या आधारावर वाटचाल करणाऱया केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारमधील अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या सरकारचे शुक्रवारी तोंडभरून कौतुक केले. उत्तर प्रदेशमधील विकासकामांसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावरून परतलेल्या चिदंबरम यांनी शुक्रवारी लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात चिदंबरम यांनी अखिलेश यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. अखिलेश हे एक तरुण नेते असून, त्यांना उत्तर प्रदेशाची चांगली जाण आहे, या शब्दांत चिदंबरम यांनी कार्यक्रमात त्यांचे कौतुक केले. यूपीए कायम उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ब्रिक्स देशांच्या परिषदेहून परतताना पत्रकारांशी बोलताना समाजवादी पक्ष यूपीएचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोघांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यामुळेच केंद्र सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
चिदंबरम यांनी केले अखिलेशचे कौतुक, निधी देण्याचे आश्वासन
द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यावर समाजवादी पक्षाच्या आधारावर वाटचाल करणाऱया केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारमधील अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या सरकारचे शुक्रवारी तोंडभरून कौतुक केले.
First published on: 29-03-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram praises akhilesh yadav