न्या. पी. सथशिवम् (६४) यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सतशिवम् हे ४०वे सरन्यायाधीश आहेत. मावळते सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांनी नऊ महिने जबाबदारी संभाळल्यानंतर सतशिवम् यांनी त्यांच्याकडमून सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे झालेल्या छोटेखानी समारंभात न्या. सतशिवम् यांनी ईश्वरास स्मरून आपल्या पदाची शपथ घेतली. या समारंभास पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली, एनडीएचे कार्यकारी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. न्या. सथशिवम् यांना २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. आता २६ एप्रिल २०१४ पर्यंत ते सरन्यायाधीशपदाची जबाबदारी संभाळतील. २७ एप्रिल १९४९ रोजी जन्मलेले न्या. सतशिवम् यांनी जुलै १९७३ मध्ये मद्रास येथे अॅडव्होकेट म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी जज्ज म्हणून नियुक्ती झाली.
आपली जबाबदारी संभाळण्यापूर्वी गुरुवारीच न्या. सथशिवम् यांनी मुख्य खटले निकाली निघण्याकामी होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. हे प्रलंबित खटले वेगाने निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरन्यायाधीश पी.सथशिवम् यांचा शपथविधी
न्या. पी. सथशिवम् (६४) यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सतशिवम् हे ४०वे सरन्यायाधीश आहेत.
First published on: 20-07-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P sathasivam sworn in chief justice of india