भारताचे चाळिसावे सरन्यायाधीश म्हणून ६४ वर्षीय पी. सथशिवम यांच्या नावाच्या शिफारशीस राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या १८ जुलै रोजी सथशिवम आपल्या पदाची शपथ घेतील.
१९६१ च्या जानेवारी महिन्यात सथशिवम यांनी मद्रास न्यायालयात न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली. २१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. सथशिवम हे २६ एप्रिल २०१४ रोजी निवृत्त होणार असून तामिळनाडू राज्यातून सरन्यायाधीशपदी पोहोचणारे ते पहिले व्यक्तिमत्त्व आहे.

Story img Loader