Padma Awards 2025 Announcement : केंद्र सरकारने आज (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरस्कारांमध्ये स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी आणि पॅरालिम्पियनमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. या बरोबरच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर दिलं आहे.

दरम्यान, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असतो. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते. आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील होमिओपॅथी चिकित्सक डॉ.विलास डांगरे यांच्यासह मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ.विलास डांगरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. ते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करतात. त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. तसेच चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma award 2025 news central govt big announcement from padma awards 2025 in marathi news gkt