अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं करोनामुळे निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कोलकातातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच डॉ. बसू यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना कोलकातातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. डॉ. शेखर बसू यांना करोनाबरोबरच किडणीचाही त्रास होता.

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. खास बाब म्हणजे डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी देखील तयार केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma shri nuclear scientist sekhar basu dies of coronavirus bmh