ओडिशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकार कमला पुजारी यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यापूर्वी नाचण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पारजा आदिवासी समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजातील नागरिक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयसीयूमध्ये नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल

कमला पुजारी यांना किडनीच्या आजारांमुळे कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ७० वर्षीय पुजारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आयसीयूमध्ये नाचताना दिसत होत्या. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर संगीत वाजत आहे. यावेळी त्याच्यासोबत काही समाजसेवकही नाचताना दिसत आहेत. त्याचवेळी कमला पुजारी यांना रुग्णालयात जबरदस्तीने नाचवल्याचा आरोप आदिवासी समाजातील लोकांनी केला आहे. याशिवाय खुद्द पुजारी यांनीही याचा खुलासा केला आहे.

जबरदस्ती नाचायला भाग पाडले

‘मला नाचायचं नव्हतं पण ममता बेहरा नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जबरदस्ती नाचायला भाग पाडलं असल्याचा आरोप कमला पुजारी यांनी केला आहे. मी वारंवार नकार दिला पण त्यांनी (समाजसेवक) माझे ऐकले नाही. मी आजारी आणि थकलो होते, तरीही मला त्यांनी नाचण्यासाठी भाग पाडले असल्याचे त्या म्हणाल्या.

२०१९ मध्ये कमला पुजारींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं

ममता बेहरा नावाच्या प्रसिद्ध समाजसेविकेवर सरकारने कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा काराटपूर येथील आदिवासी समाजाच्या अध्यक्षांनी दिला आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भातासह विविध पिकांच्या १०० हून अधिक देशी बियाणांचे जतन करण्यासाठी कमला पुजारी यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.