Pahalgam Terror Attack Updates Today : पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जातो आहे. अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता. असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला कसा धडा शिकवता येईल? याबाबत उपाय योजण्याचं कामही सुरु आहे. या सगळ्या घडामोडी जाणून घ्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Pahalgam Live Updates : "रावणाचा संहार करणं ही हिंसा नव्हती", मोहन भागवत यांचं पहलगाम हल्ल्याप्रकरणी वक्तव्य; महत्त्वाच्या घडामोडी
पहलगामचा हल्ला हा देशासाठी धक्का-शरद पवार
“भारतवासीयांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकारणात मतभिन्नता असेल. पण जेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही. आत्ता भूमिका एकच देश एकत्र ठेवणं. त्यानंतर या गोष्टींचा विचार करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण पहलगामचा विषय ऐकत आहोत. अतिरेक्यांनी हल्ले केले. निष्पाप लोकांचा बळी घेतला. जे काही घडलं ती घटना देशाला धक्का होती. हा कुठलाही जाती-धर्माला धक्का नव्हता. हा भारताला धक्का होता. भारतवासीयांवर हल्ला झाला. आता देशवासीयांसाठी ही जबाबदारी असते की राजकारणात ही मतभिन्नता नाही. केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला आपल्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, देशाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. त्यांनी हे सांगितलं की कुठेतरी कमतरता आमच्याकडून झाली. या कमतरतेवर आज चर्चा नाही. ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचं वातावरण कसं निर्माण करता येईल हे आता पाहिलं पाहिजे.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, घरात घुसून केला गोळीबार
दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम एनआयएकडून अधिक तीव्र
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दशहतवाद विरोधी एजन्सीचे आयजी, डीआयची आणि पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली काश्मीर येथील हल्ल्याचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांची चौकशी शांतपणे केली जाते आहे आणि दहशतवाद्यांचा काही ठावठिकाणा मिळतो का ते तपासलं जातं आहे.
PM Modi Mann Ki Baat: "मी आश्वासन देतो की, दहशतवाद्यांना…", 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
Video: "लढाईसाठी सज्ज", नौदलाने अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे
एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही, सगळ्यांना घालवायची व्यवस्था केली आहे-देवेंद्र फडणवीस
“मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे. एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत. सगळ्यांची घालवायची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सगळ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे
दहशतवाद्यांनी आव्हान दिलं आहे, त्यांना उत्तर द्यावं लागेल-स्मिता ठाकरे
"पहलगाम हल्ल्यात ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. ज्या प्रकारे या निरपराध लोकांना मारण्यात आलं ती बाब अत्यंत निंदनीय आहे. घरातला माणूस गमावणं आणि त्यानंतरचं होणारं दुःख हे मला माहीत आहे. ज्या प्रकारे पर्यटकांची हत्या केली ती भीतीदायक आणि दुःखदायक बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही याबाबत आपल्याला आवाहन करत आहेत. प्रत्येक भारतीय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे आधी भारतीय आहेत. ज्या प्रकारचा दहशतवाद आपल्या देशात माजवला जातो आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच सतर्क राहिलं पाहिजे. आम्हीही ठरवलं होतं की काश्मीरला जायचं, तिथे सिनेमाचं शुटिंग करायचं त्यातच ही घटना घडली. या दहशतवाद्यांनी आपल्याला एक प्रकारे आव्हान दिलं आहे. त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.
दीर्घकालीन व्हिसासाठी पाकिस्तानी महिला उच्च न्यायालयात; न्यायमूर्ती म्हणाले, "सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही"
"पाकिस्तानात माझं कोणीही नाही", ३८ वर्षांपासून भारतात राहणाऱ्या शारदाबाईंना देश सोडण्याची नोटीस
"पाकिस्तानात माझं कोणीही नाही", ३८ वर्षांपासून भारतात राहणाऱ्या शारदाबाईंना देश सोडण्याची नोटीस
पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर
जम्मू काश्मीरमधल्या कारचालकांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. कारवर पोस्टर्स लावून या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला.
सरसंंघचालक मोहन भागवत यांची पहलागम हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया काय?
“अहिंसा हे भारताचं मूल्य आहे. भारताचा तो विचार आहे. आपली अहिंसा लोकांना अहिंसक करण्यासाठी आहे. काही लोक अहिंसक होतील पण काही जण नाही बनणार नाही. तुम्ही काहीही करा त्यांना अहिंसक व्हायचं नसेल असेच हे असतील. तसंच तुम्हालाच नाही तर सगळ्या जगाला उपद्रव करतील. रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला आहे. शिवभक्त रावण, वेद माहित असणारा, उत्तम प्रशासक रावण. असे चांगले गुण रावणाकडे होतेच. पण त्याने जे शरीर, मन बुद्धी स्वीकारली त्यामुळे या चांगले गुण त्याच्यात येऊ दिले नाहीत. त्यामुळे ते शरीर, मन, बुद्धी संपवली गेली. त्यामुळेच रावणाचा संहार केला. रावणाचा संहार म्हणजे हिंसा नाही ती अहिंसाच आहे. अहिंसा आपला धर्म आहे. पण आततायी लोकांकडून मार न खाणं आणि गुंडगिरी करणाऱ्यांना धडा शिकवणं हादेखील आपला धर्म आहे.
पहलगाम हल्ल्याचा जगभरातून निषेध नोंदवला जातो आहे. या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भातल्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.