Jammu And Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या दहशतवादी हल्ल्यासंबंधी सर्व अपडेट्स आपण येथे जाणून घेणार आहोत.
JK Pahalgam Terror Attack LIVE Updates : जम्मू आणि काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यासंबंधी सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..
पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो – अजित पवार
“काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू तर, काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असे उपमुख्यमंंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
भारत प्रतिशोध नक्कीच घेणार, लक्षात ठेवा – धनंजय मुंडे
“काश्मिरच्या पेहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध! दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. हल्ल्यातील जखमींना लवकर योग्य उपचार व आराम मिळो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. हा हल्ला प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आणि वेदना देणारा आहे. भारत प्रतिशोध नक्कीच घेणार, लक्षात ठेवा.”
काश्मिरच्या पेहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 22, 2025
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. हल्ल्यातील जखमींना लवकर योग्य उपचार व आराम मिळो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना.
हा हल्ला प्रत्येक भारतीयाच्या…
Pahalgam Terror Attack: ‘मोदींना जाऊन सांगा’, दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना धमकावल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा
अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. मी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि धिक्कार करतो. खरंतर पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे. पोलिसांच्या वेषात येऊन त्यांनी नावं विचारून त्यांनी गोळ्या घातल्या आहेत. या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा निषेध करता येईल तो थोडाच आहे.
काश्मीर हे नंदनवन आहे. येथे पर्यटक पर्यटनसाठी जातात. अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी जे नीच कृत्य केलं आहे त्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. मोदींनी देखील निषेध केला आहे आणि त्यांनी स्वतः देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे. ते काश्मीरमध्ये पोहचतील. मला विश्वास आहे की अॅक्शनला रिअॅक्शन होईल. या भ्याड हल्ल्याचा बदला आपले सैनिक नक्की घेतील. पंतप्रधान आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय आणि याल करारा जवाब दिल्याशिवाय राहाणार नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
◻️LIVE | ?️ 22-04-2025
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 22, 2025
? मुंबई
? पत्रकारांशी संवाद
https://t.co/DGiBBwN1yn
“अशा नालायक शक्तींचा मुकाबला भारताला करता येतो. देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दात याची दखल घेतली आहे. गृहमंत्री तेथे पोहचत आहेत. मी स्वतः संपर्कात आहे. जी यादी आमच्याकडे आली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. काही जखमी देखील आहेत. प्रशासन मदत करत आहे,” असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा पर्यटकांवर बेछूट गोळीबार; हल्ल्यात किमान २० जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.