India Pakistan Tension Live Updates: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारत सरकारनं या हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर भारतातून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याचं दिसून आलं. दुसरीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली वाढल्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Pahalgam Terror Attack Breaking News Live Updates : भारत व पाकिस्तान खरंच युद्धाच्या उंबरठ्यावर? दोन्ही देशांत नेमकं घडतंय काय?
Pahalgam Terror Attack: पाकिस्ताननं हवाई हद्द बंद केली, पुढे काय?
पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्यानंतर आम्ही तातडीने सर्व विमान कंपन्यांना एकत्र बसवून चर्चा केली. केंद्राला प्राथमिक माहिती मिळाली आहे. आम्ही विमान कंपन्यांना परिस्थितीचा अधिक सखोल आढावा घ्यायला सांगितलं आहे. जर ही परिस्थिती सहा महिने किंवा वर्षभरासाठी चालली तर का होऊ शकेल? कोणत्या मार्गावरील विमान सेवांवर याचा परिणाम होईल? आणि भविष्यात यामुळए भारतीय विमान कंपन्या व विदेशी विमान कंपन्या यांच्यातील दरांमध्ये काय तफावत असेल? याबाबत त्यांना सविस्तर आढावा घेण्यास सांगितलं आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी आम्हाला या सर्व बाबींची सविस्तर माहिती हवी आहे - के. राम मोहन नायडू, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री
दिल्लीमध्ये संरक्षणविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदीय समितीची बैठक सुरू
बिलावल भुट्टोंना ओवैसींचं उत्तर
“बिलावल भुट्टो हे नुकतेच राजकारणात आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पाप लोकांना मारणारे चांगले का? “आय.एस.आय, इसीस किंवा पाकिस्तानमधील इतर दहशतवादी संघटनांना भारतात हिंदू-मुस्लिम वाद व्हावा असे वाटते. काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम राहू शकत नाहीत, हे त्यांना दाखवायचे आहे. जात-धर्म विचारून मारहाण करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. काश्मिरी आदिलने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. जर कोणी हिंदू-मुस्लिम करत असेल, तर ते चुकीचे आहे” असं ओवैसींनी म्हटलं आहे.
"हा मूर्खपणा आहे", दहशतवाद्यांबाबत वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप; म्हणाले, "मृतांचे नातेवाईक माफ करणार नाहीत"
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी नागरिकांची नेमकी भूमिका काय? माजी हुर्रियत नेते बिलाल गनी म्हणतात…
Omar Abdullah: "पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे माझे कर्तव्य होते"; जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणाले, "माफी मागण्यासाठी…"
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "आपण याआधी असे अनेक हल्ले पाहिले आहेत. पण इतक्या मोठ्या स्तरावर असा हल्ला बैसरणमध्ये २१ वर्षांनंतर झाला आहे. या हल्ल्या मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची कशी माफी मागावी, हेच मला कळेनासं झालं आहे. काश्मीरचा मुख्यमंत्री म्हणून इथला यजमान या नात्याने इथे आलेल्या पर्यटकांना सुरक्षित त्यांच्या घरी पाठवणं ही माझी जबाबदारी होती. मी ती पार पाडू शकलो नाही. त्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत", अशा शब्दांत ओमर अब्दुल्लांनी विधानसभेत उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत - ओमर अब्दुल्ला, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील-निशिकांत दुबे
"मी खात्रीने सांगतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ वर्षे संपेपर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे करतील. बलुचिस्तान, पख्तूनिस्तान, पंजाब आणि सिंध असे प्रांत करुन पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करुन दाखवतील." असा दावा निशिकांत दुबेंनी केला आहे. निशिकांत दुबे पुढे म्हणाले, "आता या सापांना पाणी पाजण्याची नाही तर त्यांना चिरडण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलली जातील. तसंच लवकरच मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील" असा दावा निशिकांत दुबेंनी केला आहे.
पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या सिंधी लोकांनाही परत जावं लागणार? फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
बिर्याणी विक्रेत्याची हत्या करणारा स्वयंघोषित गोरक्षक गजाआड; व्हिडीओ शेअर करत म्हणालेला, "हा पहलगामचा बदला"
किती पाकिस्तानी भारताबाहेर गेले, त्याचा नेमका आकडा पोलीस विभाग लवकरच घोषित करेल. पण जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर जायला हवेत, अशा सर्व पाकिस्तानी नागरिकांची यादी करून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितलं. त्यांचं आता ट्रॅकिंगही केलं जात आहे. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या श्रेणीत बसणारा कुणीही नागरिक असा नाही जो आम्हाला सापडलेला नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Bilal Gani Lone on Pahalgam Attack: बिलाल गनींनी पहलगाम हल्ल्यावर स्पष्ट केली भूमिका
ते दहशतवादी भारतातील, काश्मीरमधील मुस्लिमांच्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नाहीत. ज्या काश्मिरींनी दहशतवाद्यांना आसरा दिला, त्यांना तुम्ही उडवून टाका. जो चूक करेल, त्याला शिक्षा भोगावीच लागेल - माजी हुर्रियत नेते बिलाल गनी लोन यांची ठाम भूमिका
"दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला…", विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य; म्हणाले, "सरकार लोकांना भरकटवतंय"
India Bans Pakistan YouTube Channels : भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राईक'; शोएब अख्तरसहित अनेक युट्यूब चॅनेलवर आणली बंदी!
Pahalgam Terror Attack VIDEO: गोळ्यांचा आवाज; जीव वाचवण्यासाठी पळापळ, पण काश्मिरी मुलानं कसा वाचवला चिमुकल्याचा जीव पाहाच
Pro Pakistan Slogan in Bihar : बिहारमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'ची एक घोषणा आणि सोशल मीडियावर घमासान; पोलिसांनी सांगितला नेमका प्रकार!
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याचे परिणाम व त्यासंदर्भात करायच्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे.
Pahalgam Terror Attack: "हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…", काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…
Asduddin Owaisi on Pakistan: असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं
सरकारची ही जबाबदारी आहे की पाकिस्तानला एफएटीएच्या ग्रे लिस्टमध्ये टाकायला हवं. पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करणं गरजेचं आहे. पाकिस्तान अर्थ्या तासाने नाही अर्ध्या शतकाने आपल्यापेक्षा मागे आहे. तुमच्या देशाचं बजेट आमच्या देशाच्या लष्कराच्या बजेटएवढंही नाही. बरोबरी करणं तर लांबची गोष्ट. तुम्ही एखाद्या देशात जाऊन निरपराध लोकांचे जीव घेत असाल, तर कोणताही देश शांत राहणार नाही - असदुद्दीन ओवैसी, एमआयएम खासदार
पाकिस्तानवर एखादा मोठा सर्जिकल स्ट्राईक होणं गरजेचं आहे. पाकव्याप्त काश्मीर जोपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तोपर्यंत अशी कृत्य होत राहणार आहे. सीमेपलीकडून बरेच दहशतवादी भारतात घुसखोरी करत असतात. त्यांना रोखण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं आवश्यक आहे. पाकिस्तानला केंद्र सरकारनं सांगावं की पाकव्याप्त काश्मीर तुम्ही सोडा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी, शेकडो भारतीय नागरिकही मायदेशी परतले
Pakistan Fire Small Arms Across LOC: एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
रविवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून एलओसी अर्थात प्रत्यक्ष सीमारेषेवर कोणतीही सूचना न देता दारूगोळा फेकण्यात आला. कुपवाडा आणि पूँछ भागातील सीमेवर हा प्रकार घडला. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
Indians Back from Pakistan: ८५० भारतीय परतले!
दरम्यान, एकीकडे ५३७ पाकिस्तानी भारतातून परत गेले असताना दुसरीकडे ८५० भारतीय मायदेशी परतले आहेत. यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातल्या १४ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
Pakistani People Leaving India: १२ श्रेणींमधील व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिक मायदेशी
२४ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत भारतातून अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये परतलेल्या ५३७ नागरिकांमध्ये १२ श्रेणींमधील अल्पकाळ व्हिसाधारकांचा समावेश आहे.
Pakistani Leaving India: पाकिस्तानी नागरिकांनी गाठली अटारी बॉर्डर!
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं दिलेल्या निर्देशांनुसार भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी थेट अटारी सीमा गाठली आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची आकडेवारी समोर आली आहे.
Pahalgam Terror Attack Breaking News Live Updates : पाकिस्तानविरोधात भारताची आक्रमक भूमिका, पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी