Pahalgam Terror Attack Updates Today : पहलगाम हल्ल्याचा तो दिवस भारतीयांच्या मनावर कोरला गेला आहे. हा दिवस कधीही विसरता येणार नाही. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना प्राण गमवावे लागले. निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जातो आहे. तसंच पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणीही केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना ते कल्पनाही करु शकणार नाहीत अशी शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. तसंच मागील सात दिवसात मृत्यूच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्याही समोर आल्या आहेत. धर्म विचारुन दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना ठार केलं. आता या सगळ्यावर ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणीही सर्व स्तरातून होते आहे. या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊ लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Pahalgam Terror Attack Updates पहलगाम हल्ल्याला सात दिवस पूर्ण, दहशतवाद्यांचा शोध सुरुच; महत्त्वाच्या घडामोडी
‘पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य’, मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला काय निर्देश दिले?
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिलं आहे. तसेच दहशतवादाच्या विरोधात सडेतोड उत्तर देण्याचा आपला राष्ट्रीय संकल्प असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं आहे. तसेच भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपल्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं असल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
Mehbooba Mufti : “३०-४० वर्षे भारतात राहिलेल्या विवाहित महिलांनी कुठे जायचं?” मेहबुबा मुफ्तींचा सरकारला सवाल; म्हणाल्या, “अमानवीय…”
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची संरक्षण मंत्र्यांसह भारतीय लष्कराच्या प्रमुखांबरोबर बैठक सुरू
PM Modi chairs a meeting with Defence Minister, NSA, CDS and chiefs of all the Armed Forces. pic.twitter.com/fr9y5eVbet
— ANI (@ANI) April 29, 2025
काश्मीरमधली ५० पर्यटन स्थळं बंद, पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारचा मोठा निर्णय
जम्मू काश्मीर सरकारने पहलगाम हल्ल्याच्या सातव्या दिवशी मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधली ५० ठिकाणं ही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. पुरेशी सुरक्षा नसल्याने ही पर्यटनाची ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणांमध्ये वेरीनाग, बंगस खोरं, युसमार्ग रिसोर्ट यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख आहे अशी ठिकाणी खुली राहतील असं सरकारने म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत; शिक्षण आणि नोकरीसाठी तरतूद
Pahalgam Terror Attack : तीन दहशतवादी गेटवर उभे, एकजण जंगलात लपला; प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम समोर
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत, मुलांना मोफत शिक्षण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली महत्त्वाची घोषणा
“पाकिस्तानची ही जाहीर कबुली…”, भारतानं पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला खडसावलं, थेट संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत घेतला समाचार!
१ मे पासून भारतीय संरक्षक दलांमध्ये होणार महत्त्वाचे बदल
एअर मार्शल एन. तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची सीआयएससी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतीक शर्मा भारतीय लष्कराच्या उत्तरी कमांडचे नवे कमांडर असतील.
पर्यटकाने झिपलाईनवर असताना नकळत कॅमेरात कैद केला हल्ल्याचा थरार
पहलगाम हल्ल्याचा थरार एका पर्यटकाच्या व्हिडीओत कैद झाला आहे. ऋषी भट्ट असं या पर्यटकाचं नाव आहे. पहलगाम हल्ल्याला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमावावा लागला. या घटनेचा देशभरातून आणि जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान हा नवा व्हिडीओ आता समोर आला आहे. ऋषी भट्ट या पर्यटकाचा हा व्हिडीओ आहे. त्याने सांगितलं “मी पहलगामला झिपलाईनवर होतो. त्यावेळी मी व्हिडीओ अगदी सहज म्हणून घेतला. मला माहीतही नव्हतं की दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला आहे. पण ती घटना माझ्या मोबाइल व्हिडीओत नकळत कैद झाली. असं ऋषी भट्टने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. ऋषी भट्ट यांचा अहमदाबादमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. भट्ट त्यांच्या कुटुंबासह १६ ते २७ एप्रिल या कालावधीसाठी काश्मीरला सुट्टीसाठी आले होते. त्यावेळी २२ तारखेला म्हणजेच मागच्या मंगळवारी हा हल्ला झाला. ऋषी भट्ट यांच्यासह त्यांची पत्नी भक्ती आणि मुलगा प्रीतही होते.”
पहलगाम हल्ला धक्कायक, उपाय योजण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा-मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना पत्र
पहलगामचा दहशतवादी हल्ला देशाला हादरवणारा आहे. पहलगाम हल्ल्यावर उपाय योजना करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवलं जावं अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येते आहे. मी अध्यक्ष म्हणून आपल्याला ही विनंती करतो आहे की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना न्याय कसा मिळेल याची चर्चा करा. असं पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.
दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरक्षा दलांकडून अधिक तीव्र
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी आता स्थानिकांची मदत घेऊन आणि तांत्रिक मदतीद्वारेही दहशतवादी कुठे लपून बसले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ गोळीबार, भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारताने दिलं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. मात्र भारताकडून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जातंं आहे.
Indian Army effectively responded to firing by Pakistan military at some places along Line of Control in Jammu and Kashmir last night.
— All India Radio News (@airnewsalerts) April 29, 2025
Defence sources said, Pakistan Army posts fired unprovoked across the LoC in areas opposite Kupwara and Baramulla districts, as well as Akhnoor…