Pahalgam terror attack: काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यावेळी नेमके काय घडले, हे सांगणारा व्हिडीओ आता पुढे आलाय. हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओ पुढे आल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. काही सेकंदाचा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातोय.

या हल्ल्याचा पहिला अन् भयंकर व्हिडिओ समोर आलाय.पहिल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्ती बैसरन खोऱ्यातील गवतात चालताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डोंगरावरून खाली उतरत आहे. व्हिडीओमध्ये तो हात देखील दाखवतोय. काही सेकंद चालल्यानंतर गोळीबाराची घटना घडते, पाठीमागे जोरदार गोळीबार सुरू आहे. या गोळीबारानंतर व्यक्ती घाबरून जातो. मात्र, सुरूवातीला त्याला नेमके काय सुरू आहे, हेच कळत नाही. मात्र, त्यानंतर घटनेची गंभीरता लक्षात येते. तो आजूबाजूला पाहायला सुरुवात करतो. या व्हिडिओमध्ये गोळीबार आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे’. व्हिडिओमधील दिसणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे गोळीबारीचा आवाज येतोय, यावेळी तो व्यक्ती देवाची कृपा राहिली तर आम्ही वाचू असं म्हणत आहे. मागे गोळीबार होत असल्याचे लक्षात येताच व्हिडीओमध्येच थांबवण्यात आला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.