टायटन नावाच्या पाणबुडीच्या स्फोट झाला आहे. त्यामुळे त्यातल्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. टायटॅनिक या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी ही पाणबुडी गेली होती. या पाणबुडीत पाकिस्तानचे बिझनेस टायकून शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद यांचा समावेश होता. या सगळ्यांमध्ये एकटा सुलेमान हा पाच प्रवाशांमध्ये सर्वात तरुण प्रवासी होता. या सगळ्यांचा पाणबुडीच्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेनंतर आता सुलेमानच्या आत्याने हे सांगितलं आहे की या पाणबुडीमध्ये प्रवास करण्याची सुलेमानची जायची इच्छा नव्हती. तो थोडा घाबरला होता. मात्र वडील काय म्हणतील याचा विचार करुन तो गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही बातमीही वाचाः टायटन पाणबुडीत जीव गमावणारे ‘ते’ पाच अभ्यासक कोण होते? १९ वर्षीय तरुणासह त्याच्या वडिलांचाही समावेश

४६ वर्षीय शहजादा दाऊद यांच बहीण अजमेह दाऊद यांनी म्हटलंय की पाणबुडी पोलर प्रिन्स भागातून रवाना होण्याआधी मी माझ्या भाच्याशी बोलले होते. त्यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं, सुलेमान खूप घाबरला होता. मात्र फादर्स डे चा वीक एंड होता. त्यामुळे वडिलांशी असलेलं नातं आणखी चांगलं होईल हा विचार करुन सुलेमान त्यांच्यासह गेला.

अजमेह यांनी हे सांगितलं की त्यांचा भाऊ शहजादा यांना टायटॅनिक बोटीमध्ये पहिल्यापासूनच खूप रुची होती. त्यांना या बोटीविषयी आकर्षण वाटत होतं. मात्र माझा भाचा सुलेमान या पाणबुडीवर जायला तयार नव्हता.

नेमकं काय घडलं?

११० वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक या जहाजाचे अवेशष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा स्फोट झाल्याचं शोध मोहिमेत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या US कोस्ट गार्डने ही माहिती दिली आहे. १८ जूनला या पाणबुडीचा संपर्क तुटला होता. त्यानंतर नौदलाने काही वेळातच शोध मोहीम सुरु केली होती. या दरम्यान काही स्फोटसदृश आवाज आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या पाणबुडीत ९२ तास पुरेल इतका ऑक्सिजन होता. चार ते पाच दिवसांपासून या पाणबुडीचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. पण या पाणबुडीचा पाण्यात स्फोट झाला आणि पाचही जणांचा मृत्यू झाला असं बचाव पथकाने सांगितलं आहे. टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात चर्चा सुरु झाली होती.

पाणबुडीत कोण कोण प्रवासी होते?

पाकिस्तानचे वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद. अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉककन रश यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak billionaire son was terrified did not want to go on titan submarine tour said his aunt scj
Show comments