पाकिस्तानातील कराची विद्यापीठात झालेल्या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. सिंध पोलीस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. प्राथमिक तपासात बुरखा घातलेल्या महिलेने ही घटना घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले.
दुपारी अडीचच्या सुमारास व्हॅनजवळ आत्मघाती स्फोट झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनल जिओ न्यूजनुसार, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन चिनी नागरिकांचाही समावेश आहे. हे शिक्षक व्हॅनमधून कन्फ्युशियस विभागात जात असताना हा स्फोट झाला आहे.
पाकिस्तानातील कराची विद्यापीठावर झालेला हल्ला एका बुरखा घातलेल्या महिलेने घडवून आणला जी चिनी नागरिकांच्या बसची वाट पाहत होती आणि ती जवळ येताच तिने स्वत:ला उडवले. स्फोट होताच व्हॅनला आग लागली आणि त्यात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे.
दरम्यान, कराचीतील बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटच्या बाहेर एक बुरखा घातलेली महिला उभी होती, तिने चिनी शिक्षकांची बस जवळ आल्यावर स्वत:ला उडवले. सिंधचे आयजी गुलाम नबी यांनी आधीच सांगितले होते की, हा आत्मघातकी हल्ला असल्यासारखे दिसत असून बुरखा घातलेल्या महिलेची भूमिका समोर आली आहे.
या वाहनासह पाकिस्तानी लष्कराचे जवान सुरक्षेत उपस्थित होते. कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन म्हणाले की, हा आत्मघातकी स्फोटासारखा दिसत आहे. या बॉम्बस्फोटात बुरखा घातलेल्या एका महिलेचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. व्हॅनचे रक्षण करणारे पाकिस्तानी लष्कराचे चार जवानही या स्फोटात जखमी झाले आहेत.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा आत्मघाती हल्ला बीएलएच्या मजीद ब्रिगेडची महिला फिदायन हल्लेखोर शरी बलोच उर्फ ब्रमश हिने केला आहे.