दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांची पुरेशी पाठ थोपटली गेली नाही, असे सिनेटर जॉन केरी यांनी म्हटले आहे. अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला जी मदत केली ती वाखाणण्याजोगी होती, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भावी परराष्ट्रमंत्री म्हणून जाहीर केलेले, केरी यांनी म्हटले आहे.
ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पाकिस्तानने जेवढे सहकार्य केले त्याच्या तुलनेत पाकिस्तानची हवी तितकी स्तुती झाली नाही, असे केरी म्हणाले. आमच्या पथकाला पाकिस्तानात येण्याची मुभा देण्याची परवानगी देणे हा त्यांचा मोठेपणा होता आणि त्यामुळेच आम्ही लादेनचा खात्मा करू शकलो, असेही केरी म्हणाले.
ओबामा यांच्या पहिल्या कारकीर्दीत केरी यांनी पाकिस्तानसमवेतचे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी अमेरिकेची मदत केली होती आणि त्यांचे पाकिस्तानातील अनेक उच्चपदस्थ नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

Story img Loader