शस्त्रसंधीचे उल्लघंन करणा-या पाकने जम्मू, सांबा आणि अख्तूरमध्ये घुसखोरी करुन २५ भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारताचा एक जवान शहीद झाला असून एक घुसखोर ठार झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे.
शुक्रवारी खारकोटा, खारकल, एएमके, मांगरल, राजपौरा, निकोवाल आदी ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. निकोवालमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे गंगन ठाकूर आणि हसदा हे दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. जम्मू जिल्ह्य़ातील नजवाल-पारगवाल पट्टय़ात पाकिस्तानच्या लष्कराने नागरी भागांत हल्ला केला. त्यामध्ये तीन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले. तसेच, सीमेवर वाढलेल्या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला याकडे लक्ष्य देण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे २२ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमा भागाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

Story img Loader