जम्मूमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला. घुसखोरीवेळी पाकिस्तान रेंजर्सकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारालाही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
गेल्या चार दिवसांमध्ये आठव्यांदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारताच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. जम्मूमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खारकोलाजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर काही व्यक्ती पाकिस्तानकडून संशयास्पद हालचाली करीत भारताच्या दिशेने येत असल्याचे दिसले. यानंतर लगेचच जवानांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी कार्यवाही सुरू केली. घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे लक्षात येताच पाकिस्तानकडून भारतीय छावण्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात येऊ लागला. त्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. दुपारी दीड वाजेपर्यंत पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार सुरूच असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱयाने सांगितले.

Mahalaxmi murder case
“जर मी तिला मारले नसते तर तिनं…”, फ्रिज हत्याकांडात मृत आरोपीच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Loksatta explained One year of Hamas attack how situation in West Asia changing forever
हमास-इस्रायल संघर्ष वर्षभरातच संभाव्य इस्रायल-इराण लढाईपर्यंत कसा पोहोचला? पश्चिम आशियात व्यापक युद्धभडक्याची शक्यता?
no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
India response to Pakistan in the United Nations General Assembly
दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर
Israel army chief has signaled preparations for a military incursion into Lebanon
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी,इस्रायल लष्करप्रमुखांचे संकेत; हेजबोलाचा क्षेपणास्त्राने हल्ला