उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळांवर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात २३ दहशतवादी ठार झाले असून,  हल्लानंतर एका बोगद्यात दहशतवाद्यांनी लपविलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून दहशतवाद्यांविरोधात १५ जूनपासून मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मध्ये आतापर्यंत १२०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. मागच्या आठवडयात तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करुन, निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी घेतल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे.

Story img Loader