Bangladesh Unrest Reason: बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणे आणि त्या माध्यमातून शेख हसीना यांचे सरकार पाडण्याचे कारस्थान पाकिस्तानच्या आयएसआयच्या संस्थेच्या सहाय्याने लंडनमध्ये आखले गेल्याची माहिती गूप्तचर यंत्रणाकडून मिळत आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (BNP) प्रमुख आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि आयएसआय अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये बैठक झाली होती, अशी माहिती बांगलादेशी अधिकाऱ्यांनी दिली असल्याचेही इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

एक्स साईटवरील काही बांगलादेशविरोधी हँडल्स हे सातत्याने आंदोलकांना चिथावणी देत होते. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी अशा शेकडो पोस्ट हेरल्या आहेत, ज्या शेख हसीना यांच्या सरकारविरोधी आहेत. पाकिस्तानी हँडल्सवरूनही काही पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.

Manipur CM N. Biren Singh
Manipur : भाजपाला मोठा धक्का; कॉनराड संगमा यांच्या ‘एनपीपी’ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
maharashtra assembly election 2024 karnataka telangana and himachal pradesh bjp leaders criticized congress
काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ फसवणूक; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजपा नेत्यांची टीका
ed raids in jharkhand west bengal
बांगलादेशींचे घुसखोरी प्रकरण : झारखंड, प. बंगालमध्ये ईडीचे १७ ठिकाणी छापे, मतदानाच्या एक दिवस आधी कारवाई
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

हे वाचा >> बांगलादेश संसद बरखास्त, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस स्वीकारणार अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागाराची सूत्रे!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला शेख हसीना यांचे सरकार घालवून पुन्हा एकदा बीएनपीची सत्ता स्थापन करायची आहे. बीएनपी पक्ष हा पाकिस्तानधार्जिणा पक्ष मानला जातो. शेख हसीना यांच्याविरोधातील आंदोलन तीव्र होऊन शेख हसीना या देशाबाहेर जाव्यात यासाठी चीननेही आयएसआयमार्फत प्रयत्न केले असल्याचे सांगतिले जात आहे.

आंदोलनाची सुरुवात कशी झाली?

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. हळुहळु हे आंदोलन शेख हसीना च्यांच्या सरकारविरोधात उलटू लागले. आतापर्यंत आंदोलनात ३०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशमधील गूप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयचा पाठिंबा असलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेच्या इस्लामी छात्र शिबीर या विद्यार्थी शाखेने आंदोलन पेटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेख हसीना यांचे सरकार उलथवून चीन आणि पाकिस्तानधार्जिणे सरकार आणण्यात या आंदोलनाने भूमिका बजावली, असे सांगितले जात आहे.

जमात-ए-इस्लामी संघटना भारत विरोधी भूमिकेसाठी परिचित आहे. या संघटनेच्या विद्यार्थी आंदोलनाला राजकीय चळवळीचे स्वरुप देण्यात आले.

हे ही वाचा >> १५ वर्षांची सत्ता ४५ मिनिटांत कशी गेली? शेख हसीना यांच्या निवासस्थानी नाट्यमय घडामोडी; दिशाहीन झुंडीचा नेमका परिणाम काय?

सोशल मीडियातून रोष पसरविला

बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू झाल्यानंतर तेथील सोशल मीडियाचे निरीक्षण केल्यानंतर समजते की, बीएनपी पक्षाकडून अवामी लिग पक्षाविरोधात बऱ्याच पोस्ट टाकण्यात आल्या. यात आंदोलकांविरोधात हिंसा होणारे व्हिडीओ, शेख हसीना यांचे फलक फाडतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले गेले. अमेरिकेशी संबंधित असलेल्या अकाऊंटवरून या चिथावणी देणाऱ्या पोस्ट आणखी वेगाने व्हायरल करण्यात आल्या.

आणखी वाचा >> “शेख हसीना यांनी भारताचा तो सल्ला ऐकला असता तर…”, भारतानं वकेर-उझ-झमान यांच्याबद्दल कोणता इशारा दिला होता?

आंदोलकांची मूळ मागणी काय होती?

बांगलादेशसाठी १९७१ च्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी असलेल्या कुटुंबीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. या राखीव जागांचा विरोध करण्यासाठी आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागा ३० टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणल्या. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरूच राहिले आणि आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ४ ऑगस्ट रोजी आंदोलन चिघळले, ज्यामुळे १०० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.