पीटीआय, लाहोर : पाकिस्तानचे लष्कर आपल्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली १० वर्षे तुरुंगात टाकण्याची योजना आखत असून यामागे परकीय हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी केला. मात्र, आपल्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेल तोपर्यंत या बदमाशांच्या टोळीविरोधात लढत राहू असा दावाही त्यांनी केला. पत्नी बुशरा बीबी यांनाही तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप इम्रान यांनी केला.

दरम्यान, इम्रान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करणाऱ्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोविरोधात (एनएबी) कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने जाहीर केले. इम्रान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयामधून पाकिस्तान रेंजर्स या निमलष्करी दलाने अटक करून एनएबीच्या ताब्यात दिले होते. इम्रान यांच्या अटकेविरोधात ‘शांततापूर्ण’ निदर्शने करणाऱ्या ‘निशस्त्र’ लोकांवर गोळीबार करण्यास जबाबदार असणाऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही पक्षाने घोषणा केली. पक्षातर्फे गृहमंत्री, पाकिस्तान व खैबर पख्तुनख्वाहचे काळजीवाहू मुख्यमंत्री, दोन्ही प्रांतांचे पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला जाईल असे सांगण्यात आले.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

निवडणुकीसाठी संवादाचे आवाहन

दरम्यान, पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी संवाद पुन्हा सुरू करावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली. अस्थिर परिस्थितीमुळे पंजाब प्रांतामध्ये निवडणुका घेण्यात पेचप्रसंग निर्माण झाला असल्याची याचिका पाकिस्तान निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायलयात दाखल केली आहे. शांततेसाठी दोन्ही बाजूंनी संवाद सुरू करावा असे सुचवून न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी एका आठवडय़ासाठी स्थगित केली. 

लाहोर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

इम्रान खान यांच्या जामीन अर्जावर लाहोर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. इम्रान सोमवारी पत्नी बुशरा बीबी यांच्यासह उच्च न्यायालयात हजर झाले. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांच्या पत्नीला २३ मेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर इम्रान यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होईल असे जाहीर केले. गेल्या आठवडय़ात इम्रान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसेबद्दल त्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच प्रकरणात इम्रान यांनी जामीन मागितला आहे.